*
राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माढा तालुका अध्यक्षपदी संभाजी पाटील
टेंभुर्णी (प्रतिनिधी)
राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माढा तालुका अध्यक्षपदी अकोले खुर्द येथील संभाजी बबनराव पाटील यांची निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीची घोषणा जिल्हाध्यक्ष गणेश पाटील यांनी केली.
आज सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसची जिल्हा कार्यकारणी अध्यक्ष गणेश पाटील यांनी जाहीर केली यामध्ये त्यांनी माढा तालुका अध्यक्षपदी संभाजी बबनराव पाटील यांची निवड केली.
ते ज्येष्ठ नेते कै बबन बापू पाटील यांचे पुत्र असून. संभाजी पाटील यांनी याअगोदर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे. त्यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांच्या अनेक प्रश्नांना वाचा फोडत विद्यार्थ्यांचे बरेच प्रश्न मार्गी लावले होते.संभाजी पाटील यांनी माढा तालुक्यामध्ये पक्षवाढीसाठी केलेल्या कामाची दखल घेत आज त्यांची तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली.
निवडीनंतर विविध गावातील पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी निवडीबद्दल त्यांचे अभिनंदन करत जल्लोष केला.
चौकट
राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार,उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विचाराने तसेच माढय़ाचे आ.बबनदादा शिंदे व करमाळ्याचे आ.संजय मामा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका भर युवकांचे संघटन मजबूत करण्यासाठी प्रयत्न करणार : नुतन तालुकाध्यक्ष संभाजी पाटील
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा