Breaking

मंगळवार, १६ मार्च, २०२१

भिमा नदीवरील रुई बंधाऱ्याची उंची वाढविण्याचे कामाचा उद्या शुभारंभ*

भिमा नदीवरील रुई बंधाऱ्याची उंची वाढविण्याचे कामाचा उद्या शुभारंभ*
 
पालकमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार बबनदादा शिंदे,उपस्थितीत होणार कार्यक्रम - जि.प.सदस्य प्रतिनिधी शिवाजी पाटील यांची माहिती.
 
माढा व इंदापूर तालुक्यातील रुई-भाटनिमगांव बंधाऱ्याची उंची 1.50 मिटर ने वाढविण्याच्या कामाचा शुभारंभ उदया पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या शुभ हस्ते व आ. बबनराव शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच पंचायत समितीचे सभापती विक्रमसिंह शिंदे, पुणे जिल्हा राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष प्रदिप गारटकर जि.प.सदस्या अंजनादेवी शिवाजी पाटील माजी जि.प सदस्य संजय पाटील भिमानगरकर , अधिक्षक अभियंता धिरज साळे, यांचेसह इंदापूर तालुक्यातील पदाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत  होणार असून या कामासाठी कृष्णा खोरे विकास महामंडळाकडून निधी मंजूर झाला असल्याची माहिती जि.प.सदस्य प्रतिनिधी शिवाजी पाटील यांनी दिली.
 
भिमा नदीवर रुई व भाट निमगांव हा बंधारा असून तेथे पाणी गळती मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून रुई - आलेगांव व परिसरातील तसेच इंदापूर तालुक्यातील भाट-निमगांव या भागातील शेतकऱ्यांची पाणी अडविणेची मागणी होत होती, यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार,जलसंपदा मंत्री जयंत पाटील, यांचेकडे इंदापूरचे लोकप्रतिनिधी तथा राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार बबनदादा शिंदे यांनी वारंवार पाठपुरावा केल्यामुळे कृष्णा खोरे महामंडळाकडून निधी मंजूर केला असून प्रत्यक्ष कामास आता सुरुवात होणार आहे. त्यामुळे भविष्यात या भागातील शेतकऱ्यांच्या शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.
 
चौकट -
*भिमा व सिना नदीवर बुडीत बंधारे बांधणेसाठी शासनाकडे मागणी.*
 
रुई व भाट निमगांव बंधारा हा माढा व इंदापूर तालुक्यातील नदी तीरावर आहे. रुई येथील जुना बंधारा हा नदीच्या धारेवर एका बाजूला असल्याने तेथे पाणी साठवणूक होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना नदीत पाणी सोडल्यावर शेतीला पाणी मिळणेस अडचणी निर्माण होत होत्या . त्यासाठी शासनाकडे पाठपुरावा चालु होता या कामासाठी कृष्णा खोरे महामंडळाकडून 1 कोटी 55 लाख रुपयाच्या कामास मंजूरी मिळाली आहे. तसेच भिमा नदीवर आलेगांव (खु), व सुस्ते ता.पंढरपूर येथे तर सिना नदी येथे दोन बुडीत बंधारे बांधणेसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील, पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचेकडे मागणी केली असून या कामांना निधी मिळविणेसाठी प्रयत्नशील असल्याचे आ.बबनराव शिंदे यांनी सांगितले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा