महिलेला घरात घुसून बेदम मारहाण करणाऱ्या मोडनिंब येथील येथील ११ जनावर टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल*
*महिलेला घरात घुसून बेदम मारहाण अकरा जनावर ती टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल*
टेंभुर्णी प्रतिनिधी
मोडनिंब येथील एका महिलेला गणेश खडके याचा नाद सोड असे म्हणून घरात घुसून बेदम मारहाण केल्याप्रकरणी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे
वरील घटनेची टेंभुर्णी पोलिसाकडून मिळालेली माहिती अशी की मोडनिंब येथे धारीवाल टाऊनशिप शेटफळ रोड राऊत पेट्रोल पंपाजवळ मोलमजुरी करून राहणाऱ्या सारिका गणेश भांगे वय 30 ही घरामध्ये स्वयंपाक करत असताना आरोपी १) दत्तात्रेय अरुण खडके २) विशाल नंदकुमार खडके ३) अक्षय राज कुमार खडके ४) अजय राजकुमार खडके ५) प्रतीक उर्फ सोन्या भारत कांबळे ६) रंजना अरुण फडके ७) संगीता राजकुमार खडके८) पूजा गणेश खडके ९) गायत्री दत्तात्रय खडके १०) योगिता खडके ११) चंपा भारत कांबळे सर्व राहणार मोडनिंब यांनी फिर्यादीच्या घरांमध्ये जाऊन काठी व हत्याराने मारहाण करून घरामधील प्रापंचिक टीव्ही, फ्रिज, कुलर, खिडक्या ,कपाट, व घरासमोर लावलेली मोटरसायकल याचे मोठ्याप्रमाणावर नुकसान करून तू आमच्या गणेश खडके चा नाद सोड व हे गाव सोडून जा अशी धमकी देऊन फिर्यादी सारिका गणेश भांगे वय 30 राहणार मोडनिंब या महिलेला बेदम मारहाण केल्याने टेंभुर्णी पोलीस ठाण्यात वरील आकरा जनावर गुन्हा रजिस्टर नंबर 172 / 2021
भा.द.वि. कलम ३२४,३२३,५०४,५०६,१४३,१४७,१४८,१४९,३६३,४२७,४५२ प्रमाणे गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल पठाण पोलीस हेडकॉन्स्टेबल भोसले हे करीत आहेत
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा