उमरगा जिजाऊ ब्रिगेडची आढावा बैठक जिल्हाध्यक्षांच्या उपस्थितीत संपन्न*
आज जिजाऊ ब्रिगेड उमरगा तालुका व जिल्ह्याची जिल्हा अध्यक्षाच्या उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली. जिल्हा अध्यक्ष शिवमती बाबई (सुजाता) ताई चव्हाण यांनी पदाधिकाऱ्यांच्या प्रश्नांचे निरसन करून प्रत्येक पदाचे कामाची जबाबदारी प्रत्येक पदाधिकाऱ्यांवर सोपवली व कामाबद्दल मार्गदर्शन ही केले. तसेच जिजाऊ ब्रिगेडच्या रेखाताई सुर्यवंशी यांचे शिवशाही पुस्तक मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन झाल्यामुळे त्यांचा अध्यक्ष च्या वतीने सन्मान करण्यात आला व जिजाऊ ब्रिगेडच्या तालुका अध्यक्ष रेखाताई पवार यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा ही समान करण्यात आला तसेच जिजाऊ ब्रिगेडच्या तालुका सचिव मंजुषा ताई चव्हाण यांना राज्यमंत्र्यांच्या हस्ते शिवभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचाही सन्मान करण्यात आला. व जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष बाबई (सुजाता) ताई चव्हाण यांचा सत्कार उमरगा जिजाऊ ब्रिगेड च्या वतीने करण्यात आला.
त्यावेळी जिजाऊ ब्रिगडच्या जिल्हा अध्यक्ष बाबई (सुजाता) ताई चव्हाण, जिल्हा कार्याध्यक्ष सूनंदाताई माने, मीनाक्षीताई दुबे जिल्हा सघटक, जिल्हा प्रवक्त्या रेखाताई सुर्यवंशी, रेखाताई पवार तालुका अध्यक्ष, मंजुषा ताई चव्हाण तालुका सचिव, संध्याताई शिंदे तालुका उपाध्यक्ष, लता ताई भोसले तालुका कार्याध्यक्ष, राऊताई भोसले ता. कार्याध्यक्ष, रंजना जाधव तालुका कोषाध्यक्ष, सिंधुताई माने (बडूरे) शहर अध्यक्ष, ज्योती ताई कावळे शहर सचिव, श्रीदेवी बिराजदार शहर उपाध्यक्ष, अल्का बिराजदार शहर संघटक व शुभांगी बिराजदार इ.महिला उपस्थित होत्या.
प्रतिनिधी रुपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा