Breaking

बुधवार, २४ मार्च, २०२१

बीड नगर परिषदेची महात्मा गांधीच्या तिन माकडांसारखी न प्रशासनाची अवस्था,नागरीकांना मुलभूत सुविधा न उपलब्ध करून दिल्याच्या निषेधार्थ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून गांधीगिरी आंदोलन --- डाॅ.गणेश ढवळे


बीड नगर परिषदेची महात्मा गांधीच्या तिन माकडांसारखी न प्रशासनाची अवस्था,नागरीकांना मुलभूत सुविधा न उपलब्ध करून दिल्याच्या  निषेधार्थ  पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून  गांधीगिरी आंदोलन --- डाॅ.गणेश ढवळे 
बीड जिल्हा प्रतिनिधी नवनाथ आडे
AJ 24 Taas News Maharashtra

_बीड शहरातील नागरीकांना तसेच शासकीय कार्यालयासमोर शुद्ध पिण्याचे पाणी ,तसेच शौचालय असुविधा, नगररोडवरील शासकीय कार्यालयासमोर महिलांना स्वतंत्र स्वच्छतागृहे बांधण्यात आली नाहीत, पुरूषांसाठी बांधण्यात आलेली स्वच्छतागृहातील (urine pot) सदोष यंत्रणेमुळे असवच्छता व घाणीचे साम्राज्य पसरले असून त्याची नियमित साफसफाई करण्यात यावी तसेच शहरातील विजतोडणी केल्यामुळेच अंधारात वास्तव्य करणारांची विज जोडणी करण्यात यावी वरील प्रकरणात विविध राजकीय आणि सामाजिक संघटना,सामाजिक कार्यकर्ते यांनी निवेदन, आंदोलने केल्यानंतर सुद्धा सुधारणा न करण्यात आल्यामुळेच नगरपरीषदेच्या माने कॉम्प्लेक्स येथील तिन माकडांच्या प्रतिकृतीला पुष्पहार घालून डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर सामाजिक कार्यकर्ते तथा भ्रष्टाचार निर्मूलन समिती जिल्हाध्यक्ष बीड यांच्यासह शेख युनुस च-हाटकर भ्रष्टाचार निर्मूलन समिती तालुकाध्यक्ष गांधिगिरी आंदोलनात सहभागी झाले होते .

नगराध्यक्ष डाॅ.भारतभुषण क्षीरसागर व आ.संदीप क्षीरसागर यांचेच
 निवासस्थान घाणीच्या विळख्यात ,शहराची काय अवस्था:- डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर 

 बीड नगराध्यक्ष डाॅ.भारतभुषण क्षीरसागर, आ.संदीप क्षीरसागर, तथा माजी मंत्री जयदत्त (आण्णा)क्षीरसागर यांचेच निवासस्थान घाणीच्या विळख्यात असून घरासमोर मोठ्याप्रमाणात पाॅलिथिनच्या बॅगेमध्ये कचरा, तसेच सांडपाण्याचे गटार उघड्यावर असून त्यामध्ये कचरा साचल्यामुळे ते तुंबलेले आहे, त्यामुळेच बीड शहरातील समस्येकडे दुर्लक्ष करणे, सर्वत्र घाणीचे साम्राज्य असूनसुद्धा त्याकडे डोळेझाक करणे, तसेच विविध सामाजिक संघटनांनी विविध समस्याविषयी सांगितले असता कानावर हात ठेवणे, तसेच चुकीची दिशाभूल करणारी माहीती प्रसारमाध्यमांतून प्रसिद्धीस देऊन स्वतःचीच पाठ थोपटणे या नगरपरिषद प्रशासनाचा निषेध गांधीगिरी आंदोलनाद्वारे माकडांच्या तिन प्रतिकृतींना पुष्पहार घालून करण्यात आला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा