सिना माढा उपसा सिंचन योजनेचे वीज बिल महावितरण कंपनीकडे जमा......... आ. बबनदादा शिंदे
वीज पुरवठा सुरळीतपणे सुरू राहणार
बेंबळे। प्रतिनिधी
सिना-माढा उपसा सिंचन योजनेचे रब्बी हंगामातील 1 कोटी 62 लाख रूपये वीज बिल आलेले होते हे वीज बिल भरण्यासाठी शासन स्तरावर तसेच महाराष्ट्र कृष्णा खोरे महामंडळाकडे मागणी केलेली होती महामंडळाकडून वीज बिलाची रक्कम मंजूर झाल्यामुळे सिना माढा उपसा सिंचन योजनेचा वीज पुरवठा खंडीत होणार नाही अशी माहिती आ.बबनदादा शिंदे यांनी दिली.
माढा तालुक्यातील 40 हजार एकर क्षेत्राचे नंदनवन करणाऱ्या सिना माढा उपसा जलसिंचन योजना ही सन 2004 मध्ये कार्यान्वीत झालेली आहे.सध्या उन्हाळा हंगाम चालु असल्याने तालुक्यात या योजनेच्या सिंचन क्षेत्रातील उभ्या पिकांना पाण्याची नितांत गरज आहे अशा परिस्थितीत महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीकडून बील वसूलीसाठी वीज कनेक्शन तोडणेविषयी मोहीम हाती घेतलेली आहे.
शेतातील उभी असणारी पिके धोक्यात येतील ही बाब लक्षात घेत शेतकरी वर्गाला दिलासा मिळावा म्हणून सिना माढा उपसा सिंचन योजनेचे थकीत वीज बील 1 कोटी 62 लाख रूपये भरणेसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचेकडे पाठपुरावा केला होता त्यानुसार कृष्णा खोरे विकास महामंडळाने ही रक्कम मंजूर करून महाविरण कंपनीला दिल्यामुळे योजना सुरळीतपणे सुरु राहणार असून तालुक्यातील उभ्या पिकांचा, पिण्याचा पाण्याचा व जनावरांच्या चा-याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार असल्याचे आ बबनदादा शिंदे यांनी सांगितले.
सिना माढा उपसा सिंचन योजनेचे थकीत वीज बील भरल्यामुळे शेतकरी वर्गामधुन आ. शिंदे यांच्याबद्दल समाधान व्यक्त केले जात आहे.
********************Advt**********************
टेंभुर्णी जवळ सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर संगम हॉटेल ग्राहकांच्या सेवेसाठी चालू झाले असून जेवणासाठी एक वेळ भेट द्या
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा