Breaking

मंगळवार, २३ मार्च, २०२१

केवड मधील स्मशानभूमीची दुरावस्था ; सर्वत्र झुडपे वाढल्याने गैरसोयग्रामस्थांची दुरुस्तीची व साफसफाईची आग्रही मागणी



केवड मधील स्मशानभूमीची दुरावस्था ; सर्वत्र झुडपे वाढल्याने गैरसोय
ग्रामस्थांची दुरुस्तीची व साफसफाईची आग्रही मागणी

माढा / प्रतिनिधी - माढा तालुक्यातील केवड येथील सर्व जाती-धर्माच्या लोकांसाठी असलेल्या एकमेव स्मशानभूमीची खूपच दुरावस्था झाली असून ना पाण्याची सोय ना जाण्यासाठी नीट रस्ता याउलट सर्वत्र काटेरी झाडेझुडपे वाढलेली आहेत परिणामी जनतेला मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे त्यामुळे ग्रामस्थांमधून प्रशासन व ग्रामपंचायतीच्या हलगर्जीपणा विरुद्ध तीव्र संताप व्यक्त होत आहे.

स्मशानभूमीच्या परिसरात काटेरी झुडपे वाढली असून त्याठिकाणी ग्रामस्थांना जाण्यासाठी नीट वाट सुद्धा नाही एखाद्या व्यक्तीच्या अंत्यविधीला जाताना लोकांना वाट काढताना अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागत आहे.ठिकठिकाणी कचऱ्यांचे ढिगारे साचले असून या भागात लोक शौचालयासाठी बसतात त्याची दुर्गंधी येत आहे शिवाय त्याठिकाणचा हातपंपही अनेक दिवसांपासून बंद पडलेला आहे त्यामुळे ग्रामस्थांना फार मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.तरी ग्रामपंचायत व प्रशासनाने त्वरित लक्ष देऊन या परिसरातील स्वच्छता व साफसफाई करावी तसेच हातपंप दुरुस्त करावा,काटेरी झुडपे व कचऱ्यांचे ढिग हटवावेत अशी मागणी युवक आणि ग्रामस्थांमधून होत आहे.
 - केवड ता माढा स्मशानभूमी परिसरातील वाढलेल्या झाडेझुडपांचे दृश्य.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा