मराठा सेवा संघाची रविवारी बैठक
कुर्डुवाडी (प्रतिनिधी)
मराठा सेवा संघाच्या माढा तालुका कार्यकारिणीची बैठक रविवारी संध्याकाळी पाच वाजता शासकीय विश्रामगृह, कुर्डूवाडी येथे जिल्हाध्यक्ष तात्यासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आली असून या बैठकीत माढा तालुका मराठा सेवा संघाच्या आगामी वाटचालीवर चर्चा करण्यात येणार असून नवीन कार्यकारिणी निवडीसाठी मुलाखती घेण्यात येणार असल्याचे तालुकाध्यक्ष निलेश देशमुख यांनी सांगितले.
यावेळी मराठा सेवा संघात काम करू इच्छिणाऱ्यांनी मुलाखतीस उपस्थित रहावे असे आवाहन कुर्डूवाडी शहराध्यक्ष अरूण जगताप यांनी केले आहे.कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करून ही बैठक घेण्यात येणार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा