*बेंबळे गावचे माजी उपसरपंच महादेव हुंबे यांचे दुःख निधन*
बेंबळे। प्रतिनिधी।
बेंबळे येथील प्रतिष्ठित बागायतदार व सामाजिक कार्यकर्ते महादेव नारायण हुंबे वय 85 यांचे शुक्रवार दिनांक 5 मार्च 21 रोजी सकाळी 6 वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांचे पश्चात 3 मुले, 3 मुली, सुना, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे. स्वर्गीय महादेव हुंबे हे भाऊ नावाने सर्वत्र प्रसिद्ध होते, ते बेंबळे ग्रामपंचायतीचे व बेंबळे विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीचे अनेक वर्ष सदस्य म्हणून काम पाहत होते .स्पष्टवक्तेपणा, प्रामाणिकपणा व गोरगरिबांच्या विषयी असलेला कळवळा यामुळे ते हवेहवेसे वाटणारे व्यक्तीमत्व होतं .बेंबळे गावचे 15 वर्षे उपसरपंच तसेच विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्याचे मागील पंचवीस वर्षापासून असलेले संचालक विष्णुपंत हुंबे यांचे ते वडील होत.
कै.महादेव हुंबे यांचेवर त्यांच्या शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले , या प्रसंगी बेंबळे व परीसरातील शेकडो नागरिक उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा