Breaking

शनिवार, २० मार्च, २०२१

तांबवे येथे ग्रामीण स्वंयरोजगार प्रशिक्षण संस्था सोलापूर यांच्या वतीने एकदिवसीय शिबिर संपन्न.


तांबवे येथे ग्रामीण स्वंयरोजगार प्रशिक्षण संस्था सोलापूर यांच्या वतीने एकदिवसीय शिबिर संपन्न.

टेंभुर्णी प्रतिनिधी/AJ 24 Taas News 




तांबवे ता.माढा येथे बॅंक ऑफ इंडिया, ग्रामीण स्वंयरोजगार प्रशिक्षण संस्था सोलापूर व तांबवे ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने एकदिवसीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. 



तांबवे गावातील हणुमान मंदीर येथे आयोजित केलेल्या शिबिरात महिला, पुरूष, तरूण मुले यांनी आपला सहभाग मोठ्या उत्साहाने नोंदवला.या प्रशिक्षणा मध्ये उमाकांत पडवळ बॅंक ऑफ इंडिया स्टार सोलापूर आरसेटी यांनी उद्योजक होण्यासाठी मोलाचे मार्गदर्शन केले. ग्रामीण स्वंयरोजगार प्रशिक्षण संस्था सोलापूर यांच्या वतीने विविध व्यवसाय व उद्योग करण्यासाठी दहा दिवसा पासून एक महिना कालावधीचे मोफत प्रशिक्षण देण्यात येत असल्याचे सांगितले. तसेच यासाठी एक महिन्याची राहण्याची सोय, तीन वेळा चहा, नास्टा व दोन वेळचे जेवण मोफत देण्यात येत आहे.तरूण मुले व महिलांना घरबसल्या उद्योजक होण्यासाठी प्रशिक्षण घेऊन अंगी कौशल्य प्राप्त करून आपल्या उद्योग व्यवसायाची व्याप्ती वाढवावी. शिवणकला,फास्ट फूड, बेकरी प्रॉडक्ट, पेपर बॅग, मोटार गॅरेज, पेपर डिश, शेळीपालन, कुक्कुटपालन अशा अनेक उद्योगाची माहिती देवून त्यासाठी बॅंक ऑफ इंडिया मार्फत निधी उभा करून देता येईल असे यावेळी पडवळ यांनी सांगितले. 
याप्रसंगी माजी सरपंच राजाभाऊ खटके पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना तांबवे गावातील तरूणांनी व्यवसाय प्रशिक्षण घेऊन अंगी कौशल्य प्राप्त करावे व नोकरीच्या मागे न लागता स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरू करावा असे आवाहन केले. 
यावेळी प्रमुख मार्गदर्शक उमाकांत पडवळ यांचा सत्कार सरपंच सचिन दादा कांबळे व उपसरपंच सुजित भैय्या खटके पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. 
प्रतिमेच पुजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. 
यावेळी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष नागाभाऊ खटके पाटील, माजी सरपंच राजाभाऊ खटके पाटील, माजी उपसरपंच नागेश बापू खटके पाटील, माजी चेअरमन संतोष बापू खटके पाटील,चेअरमन अशोक बप्पा खटके पाटील, माजी चेअरमन भजनदास नाना खटके पाटील, सरपंच सचिन दादा कांबळे, उपसरपंच सुजित भैय्या खटके पाटील, पोलिस पाटील जयसिंग पाटील, शेती अधिकारी विजय खटके पाटील, युवा उद्योजक सतिश थोरात, सोलापूर जिल्हा भारतीय जनता पार्टी च्या महिला मोर्चा च्या जिल्हा अध्यक्षा तथा ग्रामपंचायत सदस्या अॅड सौ धनश्री खटके पाटील, सौ.अश्विनी थोरात, सौ नैना कांबळे,सौ.मिताली खटके, सौ.अश्विनी खटके सौ.तनुजा तांबोळी, सौ. राणी खटके पाटील 
संचालक सुधाकर खटके पाटील, संचालक पैगंबर तांबोळी, संचालक सज्जन दादा कांबळे, माजी उपसरपंच मधुकर खटके पाटील, सोलापूर जिल्हा काँग्रेस पक्षाचे एससी सेल सरचिटणीस मच्छिंद्र कांबळे, गणेश खटके पाटील, सागर खटके पाटील, भैय्या कांबळे, अजिंक्य खटके पाटील,  गोटूदादा खटके पाटील, वैभव देशमुख, राजेंद्र ढवळे, उपस्थित होते 
यावेळी प्रस्ताविक सतिश थोरात यांनी केले तर आभार उपसरपंच सुजित भैय्या खटके पाटील यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा