टेंभुर्णी येथे पन्नास खाटांचे उपजिल्हा रुग्णालय बांधण्यास शासनाची मान्यता....आ. बबनदादा शिंदे
.......... बबन दादा शिंदे यांच्या पाठपुराव्याला उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिली मान्यता
बेंबळे ।प्रतिनिधी। AJ 24 Taas News Maharashtra
माढा तालुक्यातील टेंभुर्णी येथे खास बाब अंतर्गत पन्नास खाटांचे उपजिल्हा रुग्णालय बांधण्यास शासनाने मंजुरी दिली असून तातडीने जागा अधिकृत होऊन करून या ठिकाणी रुग्णांच्या साठी सुसज्ज असे अत्याधुनिक पन्नास खाटांचे उपजिल्हा रुग्णालय तयार केले जाईल. यासाठी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी , आम्ही सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला मान्यता दिलेली आहे व ही अभिमानास्पद बाब आहे, अशी माहिती आमदार बबनदादा शिंदे यांनी दिली आहे.
आमदार बबनदादा शिंदे यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून त्यांच्या आजपर्यंतच्या सर्व यशस्वी कारकिर्दीत या उपजिल्हा रुग्णालयाच्या निमित्ताने एक मानाचा शिरपेच त्यांच्या नावे होत आहे हे निश्चित. याबद्दल सर्वत्र आनंद व्यक्त होत आहे.
सविस्तर वृत्तांत असा की उजनीच्या पाण्यामुळे टेंभुर्णी परिसर व या परिसरात समाविष्ट असलेल्या कोंडार भाग व बेंबळे परिसर या दोन्ही विभागाचा टेंभुर्णी शहराशी सातत्याने संबंध येत आहे. टेंभुर्णी शहराची लोकसंख्या तीस हजाराच्या आसपास असून या शहराच्या परिसरात 32 गावे व वाड्या वस्त्या येत आहेत, तसेच या परिसरात साखर कारखाने, औद्योगिक वसाहत, दूध संघ, मोठ्या बाजारपेठा ,मार्केट यार्ड, इत्यादी सर्व सुविधा उपलब्ध आहेत परंतु याठिकाणी अत्याधुनिक शासकीय आरोग्यसेवेची अत्यंत आवश्यकता होती. मागील दोन तीन वर्षापासून आमदार बबनदादा शिंदे यांनी टेंभुर्णी येथे अद्ययावत सुसज्ज असे उपजिल्हा रुग्णालय व्हावे म्हणून शासन दरबारी प्रस्ताव दाखल केला होता. याची उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दखल घेऊन टेंभुर्णी येथे पन्नास खाटांचे उपजिल्हा रुग्णालय मंजूर केले असल्याचे आमदार बबनदादा शिंदे यांनी आवर्जून सांगितले. टेंभुर्णी शहराच्या आसपास च्या परिसरातील किमान 30 ते 35 हजार नागरिकांचा टेंभुर्णी शहराशी दररोज निकटचा संबंध येत आहे तसेच आरोग्य सेवेसाठी अनेक नागरिक इतर शहरी भागाकडे जात आहेत. परंतु आता टेम्भूर्णी मध्ये उपजिल्हा रुग्णालय झाल्यानंतर या परिसरातील व शहरातील हजारो नागरिकांच्या आरोग्यासाठी उत्कृष्ट सोय होणार आहे हे निश्चित. या ठिकाणी अनेक वर्षापासून प्राथमिक आरोग्य केंद्र आहे परंतु तेथील सोयी सुविधा खूपच अपुर्या आहेत यासाठी उपजिल्हा रुग्णालयाची मागणी आमदार बबनदादा शिंदे यांनी सातत्याने पाठपुरावा करून शासनाकडून मंजूर करून घेतली आहे. त्यांच्या प्रयत्नाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दाद दिलेली आहे.
लवकरच जागेची अधिकृत स्वीकृती करून कोट्यावधी रुपयांचा निधी शासनामार्फत हे सुसज्ज रुग्णालय उभारण्यासाठी निश्चित मिळणार आहे असा पूर्ण विश्वास आमदार बबनदादा शिंदे यांनी व्यक्त केला आहे. यामुळे नागरिकांच्या मध्ये उत्साहाचे व आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा