*गेवराई पोलीस स्टेशन चे उपनिरीक्षक अर्चना भोसले मॅडम व महिला पोलीस अधिकारी यांना जागतिक महिला दिनानिमित्त पुस्तक देऊन सन्मानित करण्यात आले*
गेवराई प्रतिनिधी- नवनाथ आडे
रयत शेतकरी संघटनेच्या वतीने व प्रदेश सरचिटणीस सुनील ठोसर यांनी गेवराई पोलीस स्टेशन चे महिला पोलीस उपनिरीक्षक मनिषा जोगदंड, अर्चना भोसले, पोलीस नाईक थोरात, व महिला पोलीस अधिकारी सुश्मिता हजारे, ज्योती साळुंखे यांना जागतिक महिला दिनानिमित्त पुस्तक व नारळ श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले दरवर्षी 8 मार्च रोजी जगभरात महिला दिन जल्लोषात साजरा केला जातो, हा दिवस फक्त स्त्रियांना समर्पित म्हणून सेलिब्रेट केला जातो.याबाबत काहीच शंका नाही की आज जग कितीही प्रगती करत असेल, पण कौटुंबिक जबाबदा-या सांभाळण्यासाठी महिलांनाच सर्वोत्तम मानलं गेलं आहे. आजही आपल्या आजूबाजूला असे बरेच लोक दिसतात, जे महिलांना चार भिंतीत कैद करून ठेवणे हा त्यांचा धर्म मानतात. अशा लोकांनी कधीही दुर्लक्षित करू नये की स्त्रियांबद्दल आदर आणि प्रेम दर्शविणे हे देखील जीवनातील सर्वात मोठे कर्तव्यच आहे.
महिला आज केवळ त्यांच्या हक्कांसाठीच लढत नाहीत तर आपली स्वप्न पूर्ण करण्यास देखील त्या जागरूक आहेत. अशा परिस्थितीत जेव्हा महिला दिन म्हणजेच स्त्रियांना समर्पित दिवस जवळ येत आहे, तर मग त्यांच्यासाठी हा दिवस खास का बनविला जाऊ नये पण त्याआधी तुम्हाला हे माहित असले पाहिजे की महिला दिन का साजरा केला जातो
सत्कार करताना . प्रदेश सरचिटणीस सुनील ठोसर, बाळासाहेब मोटे, संग्राम ढोले, गणेश ढाकणे, बाबुराव भोईटे, सचिन शिंदे, सौ. त्रिवेणी ठोसर आदी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा