जागतिक महिला दिनी स्त्री स्वातंत्र्याचा आदर करत सिंदखेड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक भालचंद्र तिडके यांनी लावला आंतरजातीय विवाह.
नांदेड जिल्हा प्रतिनिधी
बालाजी सिरसाट
आज जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून नारीचा सन्मान करत आज सिंदखेड पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक भालचंद्र तिडके व सामाजिक कार्यकर्ते त्रिशूल पाटील यांनी अनोखा उपक्रम राबवून महिला दिन साजरा केला.जागतिक महिला दिनी स्त्री स्वातंत्र्याचा आदर करत सिंदखेड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक भालचंद्र तिडके यांनी लावला आंतरजातीय विवाह.
विशेष म्हणजे आज महिला दिनी स्त्री स्वातंत्र्याचा आदर करत आंतरजातीय मुला- मुलीची मध्यस्थी करून व कुटुंबियांचे संगनमत घडून सिंदखेड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक भालचंद्र तिडके व सामाजिक कार्यकर्ते त्रिशूल पाटील यांच्या मध्यस्थीने चि.सौ.का स्नेहा आदिनाथ सोनडवले व चिरंजीव अजय बाबू राठोड यांचा आंतरजातीय विवाह लावून महत्त्वाचे कार्य बजावले आहे.त्यांच्या या कार्याबद्दल सर्व स्तरातून कौतुकाचा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा