ब्रम्हाकुमारी विश्वविद्यालयाच्या मुख्य प्रशासिका राजयोगिनी गुलजारदादी यांचे देहावसान......
बेंबळे। प्रतिनिधी .
प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय माउंट आबू राजस्थान च्या मुख्य प्रशासिका राजयोगिनी दादी हृदयमोहिनीजी तथा गुलजारदादी यांचे गुरुवारी,11 मार्च रोजी, महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी 10.30 वाजता मुंबई येथील सैफ हॉस्पिटलमध्ये देहावसान झाले, त्या 93 वर्षांच्या होत्या, त्यांना दिव्य बुद्धीचे वरदान प्राप्त झाले होते. गुरुवारी 11मार्च रोजी सायंकाळी दादीजींचा पार्थिव देह मुंबईहून एअर-ॲम्बुलन्सने ब्रह्माकुमारी विश्वविद्यालयाच्या आंतरराष्ट्रीय मुख्यालय असलेल्या राजस्थान राज्यातील आबूरोड येथे आणण्यात येणार आहे व शुक्रवारी 12 मार्च रोजी तेथील सेंट्रल हॉलमध्ये अंतिम दर्शनासाठी त्यांचा देह ठेवला जाणार आहे. शनिवारी 13 मार्च रोजी सकाळी अबू पर्वतावरील' ज्ञान सरोवर' येथे, कोरोना महामारीच्या सर्व नियमांचे पालन करून, अत्यंत महत्त्वाच्या व मोजक्या व्यक्तींच्या उपस्थितीत दादीजींच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. गुलजार दादींच्या निधनाचे वृत्त समजताच भारतासहित जगातील 140 देशातील हजारो सेवा केंद्रांमध्ये शोक व्यक्त करण्यात येत आहे. विश्वविद्यालयाचे सर्व कार्यक्रम तीन दिवसांसाठी स्थगित ठेवण्यात आले असून फक्त 'योग साधना' चालू ठेवण्यात आली आहे. सोलापूर झोन मधे एकुण 42 सेंटर्स व 205 गीता पाठशाळा असून देश-विदेशात देखील लाखो नागरिक या संस्थेचे अनुयायी आहेत. दादीजींच्या निधनाबद्दल गुजरात ,राजस्थान व दिल्लीच्या राज्यपाल व मुख्यमंत्री यांनी शोक व्यक्त केला आहे. ओम शांती .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा