महिलेचा विनयभंग करणाऱ्या एकाला सहा महिने कारावासाची शिक्षा..
____________________________________
इंदापूर तालुका प्रतिनिधी- आदित्य बोराटे
वरकुटे खुर्द (ता.इंदापूर) येथील शेतात ज्वारीच्या पिकाची राखण करणार्या महिलेची विनयभंगाची सदर घटना दि.२४ फेब्रुवारी २०१४ रोजी घडली होती. पीडित महिलेने दोन आरोपी विरोधात इंदापूर पोलिस ठाण्यात कलम ३५४ व ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला होता. सदर गुन्ह्याचा तपास पो.हवालदार एस.एन.शेख यांनी करून आरोपीविरोधात इंदापूर न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. सदर गुन्ह्यात सरकारी पक्षाच्या वतीने चार साक्षीदार तपासण्यात आले होते. त्यातील तीन साक्षीदारांची साक्ष महत्त्वाची ठरल्याने कोर्टाने आरोपीला दोषी ठरवून शिक्षा सुनावली आहे.
महिलेचा विनयभंग करणारा राजाराम लक्ष्मण शेंडे (वय ७५, रा.वरकुटे खुर्द,ता.इंदापूर,जि.पुणे) याला इंदापूर सहदिवाणी न्यायालयाने दोशी ठरविले आहे. न्यायालयाने सदर गुन्ह्यातील आरोपीला सहा महिन्याचा साधा कारावास व २ हजार रुपये दंड ठोठावला आहे.
तर आरोपीला मदत करणाऱ्या एका महिलेची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आल्याचा निकाल इंदापूर सहदिवणी न्यायालयाचे न्यायादिश श्रीमती एन.ए.शेख यांच्या कोर्टाने दिला आहे. सरकारी पक्षाच्या वतीने ॲड.अमर लोहकरे यांनी कामकाज पाहिले. तर महिला पोलीस नाईक एस.एन. पारेकर यांनी कोर्ट कामकाज पूर्ण केले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा