*पुरवठाअधिकारी व गेवराई तहसीलदार यांच्यावर गुन्हा दाखल करा* - शाम अडागळे
▶️ *सुनावणी दरम्यान काही प्रश्न केल्यास साहेबांचा चढला पारा चक्क माहिती अधिकार अपीलदार व पत्रकारास शिवीगाळ पोलीस ठाण्यात तक्रार*
बीड दि 26/03/2021 रोजी तहसीलदार सचिन खाडे यांनी जिल्हा अधिकारी यांच्या नियमाला केराची टोपली दाखवत काही माहिती अधिकार अपिलकर्ते यांच्या सूनवण्या ठेवल्या होत्या सुनावणी मध्ये पत्रकार शाम अडागळे यांची सुनावणी होती.
सुनावणी दरम्यान शाम अडागळे यांनी त्यांचे म्हणे मांडले,पण साहेबांचा पारा चढला ,तहसीलदार खाडे यांनी माहिती अधिकार अपीलकर्ते शाम आडागळे यांना शिवीगाळ करून खुडचिवरून उठुन अंगावर धावून गेले व धक्का बुक्की केली असल्याचे तक्रारीमध्ये म्हटले आहे.
यावेळी उपस्थित पुरवठा अधिकारी रामदासी साहेब यांनी ''लय माजलेत'' असे ते बोलले ही सर्व घटना तहसीलदार यांच्या कॅबिन मध्ये घडली आहे व सीसीटीव्हीत रेकॉर्ड झाली आहे.
ही सर्व घटना माज्या सोबत आमचे माहिती अधिकार सुनावणी चे प्रतिनिधी राहुल चाळक, यांच्या समोर घडली तक्रारीमध्ये म्हटले आहे .
यावेळी तहसीलदार साहेब यांनी लॉक डाऊन च्या नियमाचे उल्लंघन केल्या बदल आमचे प्रतिनिधी यांच्या वर १८८ नुसार गुन्हा दाखल करण्याचे पोलीस प्रशासनाला आदेशीत केले, पण शाम आडागळे हे पत्रकार असल्याचे समजताच शाम आडागळे यांना सोडून दिले आणि त्यांनी माहिती अधिकार सुनावणी प्रतिनिधी म्हणून गेलेले राहुल चाळक,आणि इतर ऐक यांच्या वर गुन्हा दाखल करण्याचे सागितले,
या बाबत असे की - तहसीलदार सचिन खाडे यांनी आपल्या पदाचा गैर वापर केल्याचे समोर येत आहे शाम आडागळे यांनी खाडे यांच्या वर गेवराई पोलीस स्टेशन व उपविभागीयपोलीस अधिकारी कार्यालय गेवराई येते तक्रार अर्ज दिला आहे.
या तक्रार अर्जात तहसीलदार व पुरवठा अधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी केली आहे.
आता दंडाधिकारी व पुरवठा अधिकारी यांच्या वर गुन्हा दाखल होणार की नाही या प्रतीक्षेत पत्रकार शाम आडागळे आहेत.
लॉक डाऊन चे नियम तोडल्या प्रकरणी माझ्यावर व इतर ऐकावर 188 नुसार गुन्हे दाखल केले आहेत.गेवराई तहसीलदार यांनी आम्ही करत असलेल्या पारदर्शक कामाचा आंदोलनाचा राग मनात धरून हे गुन्हे हेतू परस्पर मुद्दाम दाखल केले आहेत.तहसीलदार यांनी आधी स्वतःच्या नियंत्रणात मास्क न वापरणाऱ्या अधिकारी यांच्यावर गुन्हे दाखल करावेत. प्रसार माध्यमातून ही बाब जनते समोर आलेली आहे. म्हणजे ओळख पाहून कार्यवाही करणे बंद करावे.
राहुल चाळक.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा