Breaking

बुधवार, ३१ मार्च, २०२१

भोजगाव येथील संत परिवाराला अमरसिंह पंडित यांच्या हस्ते आर्थिक मदत*



*भोजगाव येथील संत परिवाराला अमरसिंह पंडित यांच्या हस्ते आर्थिक मदत*

बीड जिल्हा प्रतिनिधी- नवनाथ आडे

गेवराई: भोजगाव येथील कै. महादेव संत यांचा २०२० मध्ये झालेल्या पावसात अमृता नदीवरील पूल वाहून गेल्यामुळे त्यात दुर्दैवी मृत्यू झाला होता. माजी आ. तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित यांनी त्यावेळेस संत परिवाराची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले होते. अमरसिंह पंडित यांच्या पाठपुराव्यामुळे संत परिवाराला शासनाची मदत मिळाली. ३० मार्च रोजी अमरसिंह पंडित यांच्या हस्ते ४ लक्ष रुपयांचा शासकीय मदतीचा धनादेश संत कुटुंबीयातील वारसदार रंजना महादेव संत यांना सुपुर्द करण्यात आला. यावेळी दत्ता संत, तात्यासाहेब संत यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
महादेव संत यांच्या परिवाराला माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या हस्ते शासकीय आर्थिक मदतीचे वाटप करण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा