Breaking

रविवार, २१ मार्च, २०२१

रुद्रपशुपती कोळेकर महाराजांनी कोरोना लस घेतली*नागरिकांनाही केले लस घेण्याचे आवाह



*रुद्रपशुपती कोळेकर महाराजांनी  कोरोना लस घेतली*


नागरिकांनाही केले लस घेण्याचे आवाहन

वडूज प्रतिनिधी / शरद कदम

        निमसोड ता. खटाव येथील मठाचे मठाधिपती श्री श्री श्री १०८ रुद्रपशुपती कोळेकर महास्वामीजी यांनी शनिवारी कोरोनाची लस घेतली. दरम्यान, पंचक्रोशी मधील ज्येष्ठ नागरिकांनी तात्काळ लस घ्यावी असे आवाहन कोळेकर महाराज यांनी केले आहे.
          गेली एक वर्ष झाले कोरोना संसर्गाने आपले पाय घट्ट रोवले आहेत. जीवन मरणाच्या वाईट प्रसंगासह लॉकडाऊन संकल्पनांना समाजमन सामोरे गेले आहे. बंद हा आता पर्याय राहिलेला नाही. बंद टाळायचा असेल तर प्रत्येकाने तोंडाला मास्क लावणे, सुरक्षित अंतर ठेवणे आता काळाची गरज बनली आहे. गेल्या दोन महिन्यापूर्वी कोरोना संसर्गावर भारतीय शास्त्रज्ञांनी लस शोधून काढली आणि संपूर्ण जगाला एक आशेचा किरण निर्माण झाला. सध्या ही लस टप्याटप्याने दिली जात आहे. डॉक्टर, वैद्यकीय क्षेत्र, पोलीस, शिक्षक असा प्राधान्य क्रम ठेवत आता ज्येष्ठ नागरिकांनाही लस दिली जात आहे. याचा समाजातील प्रत्येक ज्येष्ठांनी लाभ घ्यावा. एकही ज्येष्ठ नागरिक यातून वंचित राहणार नाही हेच आपले सर्वांचे कर्तव्य असल्याचे आवाहन कोळेकर स्वामी महाराज यांनी केले आहे.
         यावेळी परिसरातील मान्यवर, कोरोना लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर, प्रभारी वैद्यकीय अधिकारी, औषध निर्माता, सुपरवायझर, आरोग्य सेवक, सिस्टर, आशा वर्कर उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा