![]() |
*विठोबा - बिरोबा देवस्थान ट्रस्टच्या वतीने क्षिरसागर यांचा सन्मान*
वडूज प्रतिनिधी / शरद कदम
सिद्धेश्वर कुरोली ता. खटाव येथील गेली काही वर्षे विठोबा-बिरोबा देवाची वार्षिक यात्रा व वर्षभरातील अनेक धार्मिक, सामाजिक कार्यक्रमाना अनेक वृत्तपत्राच्या माध्यमातून चांगली प्रसिद्धी मिळत आहे. चालू वर्षी कोरोनामुळे मोठी यात्रा भरू शकली नाही. शासनाच्या नियमानुसार यावर्षी सोशल डिस्टन्स पाळून विश्वस्त व मानकरी मंडळींनी धार्मिक उपक्रम राबविले. या उपक्रमांची यथाशक्ती प्रसिद्धी श्री. क्षिरसागर यांनी वृत्तपत्रामधून करण्याबरोबरच भक्त परिवारामध्ये कोरोना जागृती केल्याबद्दल देवस्थान ट्रस्ट च्या वतीने येरळा परिवार संस्थापक अध्यक्ष पत्रकार धनंजय क्षीरसागर यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी माजी पंचायत समिती सदस्य मोहनराव बुधे, आण्णासाहेब हिरवे, हणमंतराव हिरवे, चंद्रकांत हिरवे, जालिंदर हिरवे, संभाजी हिरवे, हणमंत हिरवे, शहाजी हिरवे व देवस्थान ट्रस्टचे आजी -माजी पदाधिकारी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा