*वीजबिल धोरणाविरोधात कुंभेज फाटा येथे सर्वपक्षीय रास्ता रोको आंदोलन- सुदर्शन शेळके*
*करमाळा तालुका प्रतिनिधी- अतुल वारे पाटील*
करमाळा तालुक्यातील वीज वितरण कंपनी करत असलेली अन्यायकारक वीज तोड मोहीम तात्काळ थांबवावी तसेच शेतकरी व ग्राहकांना देण्यात आलेले जादा वीजबिल दुरुस्त करावे या मागणीसाठी शुक्रवारी दिनांक 19 मार्च रोजी कुंभेज फाटा येथे सर्वपक्षीय रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती स्वाभिमानीचे तालुकाध्यक्ष सुदर्शन शेळके यांनी दिली आहे.
सकाळी 11 वाजता हे आंदोलन होणार असून तालुक्यातील सर्व शेतकरी, विजग्राहक यांनी मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन सुदर्शन शेळके यांनी केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा