भिमानगर चौक नजीकच्या वैभवलक्ष्मी बियर बार मध्ये चोरी
2 लाख 51हजार रुपयाच्या विदेशी दारूची चोरी
टेंभुर्णी (प्रतिनिधी):- पुणे सोलापूर हायवे वरील भिमानगर चौक नजीक असलेले वैभवलक्ष्मी बियर बार मध्ये अज्ञात चोरट्यांनी विविध कंपनीची विदेशी दारू 2 लाख 51हजार 470 रुपये ची चोरी गेली असल्याची तक्रारी विनोद विक्रम कांबळे यांनी टेंभुर्णी पोलीस स्टेशनला दिली आहे.
सविस्तर वृत्त पुणे सोलापूर हायवे भिमानगर चौक नजिक असलेले वैभव लक्ष्मी बियर बार मध्ये 25/04/2021, रविवारी रात्री 8:30 वा. ते सोमवारी सकाळी 10:30 वा. सुमारास बियर बारचे शटर उचकटून विविध प्रकारच्या विदेशी दारू चोरीस गेली आहे.
चोरीस गेलेल्या मालाची वर्णन खालील प्रमाणे 1) 17100/- रुपये किमतीची इम्पेरियल बल्यू कंपनीच्या 95 सीलबंद बाटल्या प्रत्येकी किंमत 180 प्रमाणे,
2) 150000/- रुपये रॉयल स्टॅग कंपनीच्या 600 सीलबंद बाटल्या प्रत्येकी किंमत 250 प्रमाणे,
3) 31240/- रुपये मेगडॉल नंबर वन कंपनीच्या 142 बंद बाटल्या प्रत्येकी किंमत 220 प्रमाणे,
4) 19200/- रुपये मेकडॉल नंबर वन कंपनीच्या 375 मिलि एकूण 48 सीलबंद बाटल्या प्रत्येकी किंमत 400 प्रमाणे,
5) 2400 रुपये मेकडॉल नंबर वन कंपनीच्या प्रत्येकी 750 मीलीच्या एकूण 3 सीलबंद बाटल्या प्रत्येकी किंमत 800 प्रमाणे,
6) 3900/- रुपये रॉयल स्टॅग कंपनीच्या प्रत्येकी 180 मीलीच्या एकूण तेरा सीलबंद बाटल्या प्रत्येकी किंमत 300 प्रमाणे,
7) 16380/- रुपये ऑफिसर चॉइस कंपनीच्या प्रत्येकी 180 मिली 91 सीलबंद बाटल्या प्रत्येकी किंमत 180 प्रमाणे,
8) 1050/- रुपये कंपनीची 180 मिली ची एक सीलबंद बाटली तिची किंमत 1050 प्रमाणे,
9) 10200/- रुपये ब्लॅक डॉल गोल्ड कंपनीच्या प्रत्येकी 180 मीलीच्या एकूण 12 सीलबंद बाटल्या प्रत्येकी किंमत 850 प्रमाणे असा एकूण 2 लाख 51 हजार 470 रुपये किमतीच्या दारूच्या बाटल्या चोरी गेल्या असल्याची तक्रार टेंभुर्णी पोलीस स्टेशनला दिली असून सदर चोरीचा तपास टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे पी आय राजकुमार केंद्रे हे करीत आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा