Breaking

गुरुवार, २९ एप्रिल, २०२१

कोरोनाच्या पार्श्वभूमिवर प्रांताधिकारी यांची बुध गावास भेट*



*कोरोनाच्या पार्श्वभूमिवर प्रांताधिकारी यांची बुध गावास भेट*
वडूज प्रतिनिधी / शरद कदम

         कोरोनाची दुसरी लाट खूप भयंकर रितीने समाजात पसरत असून खटाव तालुक्यातील बुध येथे कोरोना रूग्णांची संख्या वाढत असल्यामुळे ग्रामदक्षता कमिटीने बुध बंदचा निर्णय घेतला होता. याबाबत परिविक्षाधिन प्रांताधिकारी जनार्दन कासार यांनी बुध गावाला भेट देवून संपूर्ण भागाची पाहणी केली. यावेळी लोकनियुक्त सरपंच अभयसिंह राजेघाटगे, ग्रामविकास अधिकारी शशिकांत माने, पत्रकार प्रकाश राजेघाटगे, केंद्रप्रमुख प्रमोद जगदाळे, सर्कल अमृत नाळे, तलाठी किशोर घनवट, बीट अंमलदार सचिन माने, श्री कुदळे व ग्रामदक्षता कमिटीचे सदस्य उपस्थित होते.
         यावेळी प्रांताधिकारी श्री. कासार म्हणाले की, कोरोनाचा प्रसार वाढत असल्यामुळे आरोग्य यंत्रणेवर अतिशय मोठा ताण पडला आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत गाव तेथे क्वारंटाईन सेंटर उभारणे आवश्यक आहे. गाव तेथे क्वारंटाईन सेंटर उभारणी केल्यास गावातील जिल्हा परिषद शाळा व हायस्कूलचा वापर करून रूग्ण संख्या कमी करता येऊ शकते. रूण गावातच राहिल्याने घरचा डबा व पोष्टिक खाद्य मिळू शकेल. 
       तसेच बुध आरोग्य उपकेंद्रात सुरू असलेल्या लसीकरण केंद्राला त्यांनी भेट दिली. तेथे काही अडचणी आल्यास तात्काळ अडचणी सोडविल्या जातील. लसीकरण मोहिम १०० % यशस्वी झाली पाहिजे. त्यामुळे रूग्णांची संख्या कमी होईल . यासर्व काळात प्रशासन व ग्रामसुरक्षा कमिटीने हातात हात घालून काम केल्यास करोनाच्या संकटावर मात करू शकतो . गावातील सर्व दुकानदारांनी शासनाच्या नियमांचे पालन करावे, बंदच्या काळात चोरून दुकाने उघडली तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे संकेत दिले . ग्रामसुरक्षा कमिटीला शासनाने भरपूर अधिकार दिले असून त्या अधिकाराचा वापर कमिटीने करावा व काही अडचण असल्यास माझ्याशी संपर्क करावा असे आवाहन त्यांनी केले.
        दरम्यान बुध येथील जिल्हा परिषद शाळा,श्री.नागनाथ विद्यामंदिर येथे भेट देऊन पाहणी केली. या ठिकाणी क्वारंटाईन सेंटर सुरू करावे असे ग्रामसुरक्षा कमिटीच्या सदस्यांना सुचनाही केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा