तुळजापूर येथे रक्तदान शिबिरात 21 रक्तदात्यांची रक्तदान*
तुळजापूर -(दिनांक 13 एप्रिल)
प.पु.श्री राजाराम गुरु सखाराम नंदीबुवा महाराज चॅरिटेबल ट्रस्टचे 12 वे वर्धापनानिमित्त व गुढी पाडवा निमीत्त रक्तदान शिबिरात 21 रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक जाणीव जपली .
शिबिराचे उद्घाटन *नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांच्या हस्ते झाले सदरील शिबीरास नगरसेवक विजय कंदले,संग्राम पाटील नागेशशास्त्री नंदिबुवा, राजाराम नंदिबुवा, गणेश नंदिबुवा, महेश नंदिबुवा, श्रीकृष्ण नंदिबुवा, श्रीराम नंदिबुवा, श्रीहरी नंदिबुवा ,दिनेश देशमुख, सर्वोत्तम जेवळीकर आदी उपस्थित होते.
सध्या रक्ताचा तुटवडा असून सदर शिबिराचे आयोजन करून एक प्रेरणादायी उपक्रम राबवला आहे त्याबद्दल शिबिर संयोजकांचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे. रक्तदान शिबिरामध्ये सातत्य ठेवून सदरील ट्रस्टने तुळजापूर शहरात रक्तदान चळवळीत एक आदर्श निर्माण केले असल्याचे मत नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांनी व्यक्त केले.
प्रतिनिधी रुपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा