Breaking

बुधवार, १४ एप्रिल, २०२१

करमाळा तालुक्यात महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी*

करमाळा तालुक्यात महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी*
*करमाळा तालुका प्रतिनिधी- अतुल वारे पाटील*
 करमाळा शहरासह ग्रामीण भागात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
        यावर्षी या उत्सवावर कोरोनाचे सावट होते . मात्र विविध राजकीय पक्ष,सामाजिक संघटना यांच्यासह भीम अनुयायांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना सोशल डिस्टनसिंग चे पालन करत अभिवादन केले.करमाळा शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे सकाळपासून अभिवादनासाठी अनुयायांनी गर्दी केली होती.
अभिवादनासाठी एकावेळी फक्त 5 जनांनाच प्रवेश देण्यात येत होता. मराठा सेवा संघाच्या वतीने तालुकाध्यक्ष अतुल वारे पाटील,सचिव सचिन शिंदे,डॉ बिभीषण सारंगकर, डॉ बाबुराव लावंड,डॉ पोपट नेटके,डॉ अविनाश घोलप,डॉ प्रमोद शिंदे, डॉ अनुप खोसे,डॉ सादिक बागवान,पंजाबराव देशमुख शिक्षक परिषद जिल्हा उपाध्यक्ष सतीश वीर,तालुका सचिव संतोष शितोळे, शिक्षक नेते रमाकांत गटकळ,   
 भाजपा तालुका अध्यक्ष गणेश चिवटे  , नेते विठ्ठलराव भणगे,जिल्हा सरचिटणीस किरण बोकन, तालुका उपाध्यक्ष रामभाऊ ढाणे, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष सचिन गायकवाड ,तालुका चिटणीस आजिनाथ सुरवसे, तालुका प्रसिद्धीप्रमुख जयंत काळे पाटील ,शरद कोकीळ,  लक्ष्मण काळे, गणेश गोसावी, अशोक सावंत, हर्षद गाडे,  प्रसाद गेंड  शहराध्यक्ष जगदिश आगरवाल ,भा.ज.पा तालुका सरचिटणीस अमरजीत साळुंखे,भा.ज.पा व्यापारी आघाडीचे शहराध्यक्ष जितेश कटारिया, भा.ज.युवा मोर्चाचे मयूर देवी, सहकार आघाडीचे सचिन चव्हाण,गणेश सातपुते ,अ.भा.वि. प चे संतोष कांबळे, प्रसिद्ध हॉटेल उद्योजक संभाजी माने,अवि माने
   जातेगाव येथे सरपंच छगन ससाणे,उपसरपंच अच्युत कामटे,कृ उ बाजार समितीचे संचालक संतोष वारे, मराठा सेवा संघ तालुकाध्यक्ष अतुल वारे पाटील, प्रवीण शिंदे,सचिन शिंदे, बलभीम आरणे, ईश्वर वारे,सोमनाथ पोळ, अमोल आरणे,  भैरवनाथ चव्हाण ,सचिन उबाळे ,गणेश चव्हाण ,बाबासाहेब पोळ राहुल पोळ तसेच ग्रामस्थांच्या उपस्थितीत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले.

      उमरड ता. करमाळा येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती ग्रामपंचायत कार्यलय येथे उत्साहात साजरी करण्यात आली. यंदा कोरोनाच्या कारणाने सोशल डिस्टन्स पाळत जयंती साजरी केली. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रमोद बदे,सरपंच बापू चोरमले, सदस्य बापू पडवळे,डि जी बदे पोपट कदम,तात्या मारकड, महेंद्र पाखरे, संदिप बदे,सुरेंद्र कदम,निलेश चौधरी , अमोल खंडाळे,महेंद्र कांबळे, भगीरथ मारकड यांच्यासह  नागरीक बहुसंख्येने उपस्थित होते.

   डॉ बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती  जयंती उत्सव समितीचे दशरथराव कांबळे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. ऍड महादेव कांबळे यांनी आभार मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा