नळदुर्ग येथे मुलाच्या वाढदिवसा निमित्ताने डॉ. मंगरूळे यांनी केली पोलीस कर्मचारी व पत्रकारांची आरोग्य तपासणी, दिले मोफत सँनिटायझर व मास्क*
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नळदुर्ग ता.तुळजापूर येथील डॉ. भरत मंगरुळे यांनी आपल्या मुलाच्या वाढदिवसा निमित्ताने नळदुर्ग व परिसरातील पत्रकार आणि नळदुर्ग पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांची मोफत आरोग्य तपासणी करून त्यांना सँनिटायझर व मास्कचे मोफत वाटप केले.
वाढदिवस म्हटल की केक कापने,फटाक्यांची आतिषबाजी करणे,पार्टी देणे, वगेरे कार्यक्रम केले जातात परंतु येथील डॉ. मंगरूळे यांनी सध्याच्या परिस्थितीचे गांभीर्य ओळखून या सर्व प्रकाराला फाटा देऊन कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केल्या जाणाऱ्या उपाययोजनाची अमलबजावणी करण्याच्या द्रष्टीने स्व:ताच्या जिवाची पर्वा न करता शासना व प्रशाना बरोबर काम करणाऱ्या पत्रकार व पोलीस कर्मचारी यांची आपला मुलगा भाग्यराज भरत मंगरुळे यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य तपासणी करून त्यांना मोफत सँनिटायझर व मास्कचे वाटप केले.
या प्रसंगी नळदुर्ग पोलीस ठाण्याचे स.पो.नि जगदीश राऊत सह पोलीस कर्मचारी,पत्रकार विलास येडगे,सचिन गायकवाड, लतिप शेख,किशोर धुमाळ, दादासाहेब बनसोडे, भैरवनाथ कानडे,भगवंत सुरवसे, एस.के.गायकवाड, परिवर्तन सामाजिक संस्थेचे मारूती बनसोडे, सामाजिक कार्यकर्ते धर्मराज देडे, राष्ट्रवादी नळदुर्ग शहराध्यक्ष आनंद पुदाले ,सचिन टेकाळे,आदी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा