*चव्हाणवाडी ( टे) ग्रा.पं. च्या वतीने कोरोना तपासणी शिबीर संपन्न*
टेंभुर्णी प्रतिनिधी/ अमोल भोसले
महाराष्ट्रामध्ये शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागामध्ये ही मोठ्या प्रमाणामध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याचे आढळून येत आहे याच धर्तीवर ती टेंभुर्णी जवळ असलेल्या चव्हाणवाडी टें. ग्रा.पं.च्यावतीने गावामध्ये आज कोरोना तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
सदर शिबिरामध्ये गावांमधील एकूण 35 हाय रिस्क कॉन्टॅक्ट व्यक्तींची तपासणी करण्यात आली, त्याचबरोबर काही नागरिकांनी स्वच्छेने तपासणी केली. यामध्ये एकूण पाच रुग्ण पॉझिटिव्ह आले असून 30 रुग्ण निगेटिव्ह आहेत. इतर गावाच्या मानाने चव्हाणवाडी मध्ये रुग्ण संख्या कमी असून नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घेणे गरजेचे आहे. कोरणा ची कोणतीही लक्षणे दिसताच लगेच तपासणी करून घ्यावी व प्रशासनाला सहकार्य करावे असे मत ग्रामपंचायतचे कर्तव्यदक्ष सरपंच मा. श्री. सुनील मिस्कीन यांनी सांगितले. सदर तपासणी शिबिराच्या वेळी अशोक (बापू) मिस्कीन चव्हाण वाडी चे माजी सरपंच हनुमंत (आण्णा )चव्हाण, नवनाथ चव्हाण ग्रामपंचायत सदस्य नवनाथ शिंदे तसेच प्रा. मनोज नांगरे सर ,विजय कदम, हनुमंत इंदलकर, अण्णा सलगर,आरोग्य सेविका ओहोळ मॅडम व त्यांचे सर्व सहकारी, सराफ गुरुजी साळुंके व खरात मॅडम तसेच ग्रामसेवक साळुंके साहेब, सागर पवार, अमोल इंदलकर अधिक जण उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा