Breaking

बुधवार, २८ एप्रिल, २०२१

माढा विधानसभा मतदारसंघातील गावांना ग्रामविकास विभागाकडून 2 कोटी 21 लाख रुपयाचा निधी मंजूरपंढरपूर माळशिरस तालुक्यातील 23 गावांना निधी मिळणार.. - आ.बबनदादा शिंदे यांची माहिती




माढा  विधानसभा मतदारसंघातील गावांना ग्रामविकास विभागाकडून  2 कोटी 21 लाख रुपयाचा निधी मंजूर

पंढरपूर माळशिरस तालुक्यातील 23 गावांना निधी मिळणार..

 - आ.बबनदादा शिंदे यांची माहिती

माढा विधानसभा मतदारसंघातील पंढरपूर व माळशिरस तालुक्यामधील गावांतील गावाअंतर्गत वाडी वस्तीवरील नागरिकांना मुलभुत सोयी सुविधा पुरविनेच्या 2515 या योजनेतंर्गत विविध विकासकामे करणे करीता  ग्रामीण विकास विभागाकडून 2 कोटी  21 लाख रूपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती आ.बबनदादा शिंदे यांनी दिली.

याबाबत सविस्तर माहीती देताना आ.शिंदे यांनी सांगितले की, ग्रामीण भागातील प्रमुख गाव अंतर्गत रस्ते काँक्रिटकरण, वाड्यावस्त्यांवरील रस्ते खडीकरण व मुरमीकरण करणे  तसेच पेव्हींग ब्लॉक बसविणे, भुयारी गटार दुरुस्ती करणे, सामाजिक सभागृह बांधणे या सारखी अनेक विकास कामे करणेकरीता शासनाकडे निधी मिळणेसाठी  मागणी केलेली होती. त्यानुसार शासनाने माढा विधानसभा मतदारसंघातील समाविष्ठ पंढरपूर व  माळशिरस तालुक्यातील विकास  कामासाठी 2 कोटी 21 लाख रूपयांचा निधी मंजूर केलेला आहे. लवकरच ही कामे सुरू होणार आहे.

यामध्ये  पंढरपूर तालुक्यातील जळोली - रक्कम रु. 10 लाख, कान्हापूरी - रक्कम रु. 10 लाख, सांगवी - रक्कम रु. 10 लाख, चिंचणी - रक्कम रु. 10 लाख, नेमतवाडी - रक्कम रु. 10 लाख, पेह- रक्कम रु. 10 लाख, टाकळी (पु)-जळोली - रक्कम रु. 10 लाख, वाडी-कुरोली - रक्कम रु. 10 लाख, खेड-भोसे - रक्कम रु. 10 लाख, खरातवाडी- रक्कम रु. 10 लाख, अजोती - रक्कम रु. 10 लाख, ना.चिंचोली - रक्कम रु. 10 लाख, भटुंबरे - रक्कम रु. 10 लाख, भटुंबरे उजनी वसाहत - रक्कम रु. 7 लाख, सुगांव (खेडभोसे)- रक्कम रु. 10 लाख, तरटगांव - रक्कम रु. 7 लाख, बादलकोट- रक्कम रु. 5 लाख, उजनी वसाहत(पट-कुरोली) - रक्कम रु. 9 लाख,तसेच माळशिरस तालुक्यातील लवंग - रक्कम रु. 13 लाख, वाघोली - रक्कम रु. 10 लाख, वाफेगांव - रक्कम रु. 10 लाख, उंबरे (वे) - रक्कम रु. 10 लाख, कोंढारपट्टा - रक्कम रु. 10 लाख                                                                      असा एकुण 2 कोटी 21 लाख रूपयांचा  निधी विकास कामासाठी मंजूर झालेला आहे.

सदर निधीची तरतुद करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार व ग्रामविकास मंत्री ना. हसन मुश्रीफ यांच्या सहकार्यामुळे निधीची तरतुदी झाली असल्याने मतदारसंघातील विकास कामांना गती मिळणार असून मंजूर झालेली कामे लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचे आ.शिंदे यांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा