दिव्यांगाना अंत्योदय योजनेत सामावून स्वतंत्र शिधापत्रिका द्या---- रघुनाथ तोंडे
बीड जिल्ह्यातील दिव्यांग अंत्योदय योजनेपासून वंचित
बीड जिल्हा प्रतिनिधी- नवनाथ आडे
(:- महाराष्ट्र राज्यातील शासनाची दिव्यांग साठी ची अंत्योदय योजना असून दिव्यांगांना अंत्योदय योजनेत सामावून घेऊन स्वतंत्र शिधापत्रिका देण्यात यावे असे प्रहार संघटनेच्या वतीने बीड जिल्हा अध्यक्ष रघुनाथ तोंडे यांनी प्रहार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी बीड यांना निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे बीड जिल्ह्यातील दिव्यांगांची कोरोणा या माहामारी मुळे परीस्थिती फार बीकट झाली असुन दिव्यांगांना अन्न पुरवठा योजनेतून शिधा पत्रिका लाभ मिळत नसुन बीड जिल्ह्यातील दिव्यांनी बांधव अंत्योदय योजनेपासून वंचित रहात असुन महाराष्ट्र शासनाच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या आदेशानुसार दिव्यांग व्यक्तींना अंत्योदय शिधा पत्रिका देताना प्राधान्य देण्यात यावे असा आदेश असून दिव्यांग कायदा 2016 च्या दिव्यांग व्यक्तींना हक्क अधिनियम कायदा या कायद्यानुसार दिव्यांग व्यक्तींना अंत्योदय अन्न शिधापत्रिका योजनेचा लाभ मिळने गरजेचे आहे तरी जिल्हाधिकारी साहेब यांनी बीड जिल्ह्यातील दिव्यांगांना त्वरित अंत्योदय कार्ड वाटप करुन दिव्यांगा अंत्योदय योजनेचा लाभ मिळून देण्यात यावा असे निवेदन प्रहार संघटनेच्या वतीने जिल्हा अध्यक्ष रघुनाथ तोंडे यांनी जिल्हाधिकारी बीड यांना दिले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा