Breaking

बुधवार, २१ एप्रिल, २०२१

ढेकरी येथे महामानव विश्वरत्न डॉ, बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले, यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबीर संपन्न*



ढेकरी येथे महामानव विश्वरत्न डॉ, बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले, यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबीर संपन्न*


 डॉ, बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले, यांच्या जयंतीनिमित्त सिद्धार्थ तरुण मंडळ ढेकरी तालुका तुळजापूर येथे आज दि,२१ एप्रिल २०२१,रोजी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते, या रक्तदान शिबिराचे आयोजन सिद्धार्थ तरुण मंडळ, सिद्धार्थ शैक्षणिक बहुउद्देशीय सामाजिक संस्था, छत्रपती ग्रुप, जय भवानी तरुण मंडळ, जय हनुमान तरुण मंडळ, अण्णाभाऊ साठे विचार मंच, त्रिशूल तरुण मंडळ, राजे ग्रुप, गोपीनाथराव मुंडे प्रतिष्ठान, व ग्रामस्थ  यांनी केले, रक्तदान शिबिरास शासकीय रक्तपेढी जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद यांनी सहकार्य केले, यामध्ये स्त्री-पुरुष रक्तदात्यांनी उस्फूर्तपणे आपला सहभाग नोंदविला, रक्तदान शिबिराचे उद्घाटन सरपंच ज्योती ठोंबरे, उपसरपंच वैशाली महाडिक, डॉक्टर अश्विनी गोरे व डॉक्टर खाडप यांनी केले रक्तदात्यांना सिद्धार्थ तरुण मंडळाकडून प्रमाणपत्र व भेटवस्तू देण्यात आल्या, यावेळी सिद्धार्थ मंडळाचे सदस्य उपस्थित होते.

प्रतिनिधी रूपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा