Breaking

रविवार, १८ एप्रिल, २०२१

आमदार भीमराव केरामांचा स्थानिक विकास निधी कोरोना रुग्णासाठी समर्पित... रेमडेसिविर व शव वाहिनी वाहना करिता पंधरा लक्ष रुपये...


आमदार भीमराव केरामांचा स्थानिक विकास निधी कोरोना रुग्णासाठी समर्पित... 

रेमडेसिविर व शव वाहिनी वाहना करिता पंधरा लक्ष रुपये... 

नांदेड जिल्हा प्रतिनिधी:
बालाजी सिरसाट

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्याने माहूर किनवट तालुक्यातील गोरगरीब रुग्णांना रेमडेसिविर सारखे अत्यंत महत्वाचे इंजेक्शन सहज उपलब्ध व्हावे हेतूने आमदार भीमराव केराम यांनी मतदारसंघातील रूग्णांसाठी स्थानिक विकास निधीतून पाच लक्ष रुपयाचे रेमडेसिविर इंजेक्शन्स व तसेच दोन तालुक्यांसाठी शव वाहिनी वाहन खरेदी करणे साठी जिल्हाधिकारी यांना पत्र पाठवून आरोग्यविषयक साहित्य सामग्री खरेदी करण्यासाठी निधी खर्च करण्याचे कळविले आहे.

राज्य शासनाने संचारबंदी घोषित करण्यापूर्वी नांदेड जिल्हाधिकाऱ्यांनी दिवसाची जमावबंदी व रात्रीची संचारबंदी लावली होती.तरी देखील नांदेड जिल्ह्यात कोरोना संक्रमित रुग्णाचा आकडा काही केल्या कमी होत नाही.सर्व उपाययोजना करताना प्रशासनाच्या पर्यायाने आरोग्य यंत्रणेच्या नाकी नऊ आले आहेत.कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना सध्याच्या परिस्थितीत रेमडिसिविर इंजेक्शन्स ची गरज असून या इंजेक्शन ची साठेबाजी करून कृत्रिम तुटवडा निर्माण केला जात आहे.शहराच्या ठिकाणी या इंजेक्शन साठी वशिलेबाजी लावण्याची दुर्दैवी वेळ रुग्णांच्या नातेवाईकांवर आल्याचे बातम्या दररोज माध्यमात वाचायला मिळताहेत.या सर्व परिस्थितीचे गांभीर्याने विचार करून किनवट विधानसभा मतदार संघाचे आमदार भीमराव केराम यांनी आपल्या स्थानिक विकास निधीतून ग्रामीण रुग्णालय माहूर व उपजिल्हा रुग्णालय किनवट साठी पाच लक्ष रुपयाचे रेमडीसीवीर इंजेक्शन तसेच पाच लक्ष रुपये किमतीच्या दोन शव वाहिनी वाहन खरेदी करण्यासाठी शासनाला पत्र देऊन साहित्य सामग्री खरेदी करण्यासाठी मंजुरी देऊन तातडीने निधी उपलब्ध करून देण्यासाठी चे पत्र (ता.१७) रोजी आमदार भीमराव केराम यांनी जिल्हाधिकारी नांदेड यांना दिले आहे.एकंदरीत आमदार भीमराव केराम हे पदावर विराजमान झाल्यापासून त्यांच्या स्थानिक विकास निधी अधिक अधिक प्रमाणात आरोग्य सुविधांवर कशा पद्धतीने खर्च करता येईल यासाठी आग्रही आहेत.एरवी आमदार निधीचा विनियोग मर्जीतील लाभार्थी कार्यकर्त्यांना खुश ठेवण्यासाठी निम्मा बटाई परतावा मिळेल या हेतूने खर्च केला जातो.परंतु आमदार केरमांच्या स्थानिक विकास निधी च्या बाबतीत सुरुवातीपासूनच सर्वसामान्यासाठी ज्या आवश्यक गरजा आहेत.त्या पूर्ण करण्यासाठी खर्च केला जातोय शिवाय डोंगर दऱ्याखोऱ्यातील मोलमजुरी करणारा प्रत्येक मतदार हा त्यांचा विकासाचा केंद्रबिंदू राहिला आहे.मग ते आरोग्याच्या बाबतीत असो की इतर कोणत्याही जीवन आवश्यक सोयी सुविधांच्या बाबतीत प्राधान्यक्रम अशाच तळागाळातील नागरिकांसाठी राखला गेल्याने कोरोना महामारी च्या संकटकाळात खऱ्या अर्थाने मतदारांचे मन जिंकण्यात आमदार भीमराव केराम यशस्वी झाले असल्याची चर्चा संपूर्ण मतदारसंघात ऐकायला मिळत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा