*तुळजापूर खुर्द येथील शिवरत्न नगर भागात पाणी टंचाईवर मात*
तुळजापुर(खुर्द) चा ऐक भाग असलेला शिवरत्न नगर,साबळे फ्लॅटिंग येथील सततची होणारी पाणी टंचाई लक्षात घेता तालुक्याचे आमदार आमदार राणाजगजितसिंह पाटील ,तेथे पहाणी केली व तेथील पाणी प्रश्न मार्गी लावण्या बाबत नगर परिषदला सांगितले त्या अनुशंगाने युवा नेते विनोद (पिटु) गंगणे,नगराध्यक्ष सचिन रोचकरी,नगरसेवक पंडीतराव जगदाळे ,नगरसेविका सौ मंजुषाताई देशमाने व श्री राजाभाऊ देशमाने, यांनी नगर परिषदच्या माध्यमातुन शिवरत्न नगर,साबळे पलॅटिग येथे कुपनलिका(बोर) खोदण्यात आली व बोअरची मोटार सोडून तेथील सततचा भेडसावत असलेल्या पाणी प्रश्न मार्गी लावला त्या कुपनलिका(बोर) ला चांगल्या प्रमाणात पाणी ही लागले आहे.
तेथील नागरीकांचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागला त्यामुळे तेथील नागरीकांनी समाधान व्यक्त केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा