Breaking

शनिवार, १० एप्रिल, २०२१

खटाव तालुक्यासह वडूजमध्ये कडक लॉकडाउन*काही ठिकाणी पोलीस कर्मचारी व नागरिकांमध्ये किरकोळ बाचाबाची.


*खटाव तालुक्यासह वडूजमध्ये कडक लॉकडाउन*

काही ठिकाणी पोलीस कर्मचारी व नागरिकांमध्ये किरकोळ बाचाबाची.
 वडूज प्रतिनिधी / शरद कदम

    खटाव तालुक्यामध्ये कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी शासनाने पुकारलेल्या दोन दिवसीय पूर्ण लॉकडाउनला आज सुरुवात झाली असून पहिल्याच दिवशी खटावकर जनतेने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. पंरतु काही ठिकाणी पोलिस कर्मचारी व नागरिकांमध्ये मास्क नसणे, मास्क असलेच तर नाकावर का नाही ? हि विचारणा पोलीस कर्मचारी यांच्याकडून होत होती. अशा वेळी वाद निर्माण होत आहे.
        आज खटावसह वडूजमध्ये अत्यावश्यक सेवा वगळून सर्व व्यवहार बंद राहिल्याने रस्त्यावर सर्वत्र सामसूम दिसत होती. सध्या खटाव मध्ये कोरोनाची संख्या ही चिंताजनक असून त्यासाठी आरोग्य विभाग ही सज्ज आहे. या विभागाच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबातील सर्वे करण्यासाठी भेटी दिल्या जात आहेत.
     शासनाने शनिवार व रविवार अश्या दोन दिवसाचे पुर्ण लॉकडाउनची घोषणा केली त्यास तालुक्यासह वडूजकरांनीही चांगला प्रतिसाद दिलाआहे .आज वडूज येथे सर्व व्यवसायाकांनी आपआपली दुकाने बंद ठेवून सदरच्या लॉकडाउनला प्रतिसाद दिला.
         यावेळी पोलिस प्रशासनाच्या वतीने योग्य त्या ठिकाणी बंदोबस्त ठेवण्यात आला होता. काही तुरळक ठिकाणी अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली फिरणाऱ्या नागरिकांच्यामध्ये व पोलीस प्रशासनानामध्ये दंड आकारण्यावरून बाचाबाचीचे ही प्रकार घडले. यावेळी रस्त्यावर अनावश्यक फिरणाऱ्या लोकांना मास्क न वापरणे, टू व्हिलर वर एक ऐवजी ट्रिपल सीटचा वावर होत असल्यामुळे चाप बसावा म्हणून व विनाकारण शहरामध्ये फिरणाऱ्या नागरिकांकडून दंड वसूल करण्यात येत होता. त्यामुळे खऱ्या अर्थाने पहिल्या दिवशी लॉकडाउन खटाव व वडूज शहरामध्ये यशस्वी झाला असे वाटते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा