*शनिवार, रविवार बीड जिल्ह्यात कडेकोट संचारबंदी*
बीड जिल्हा प्रतिनिधी- नवनाथ आडे- य
आज मध्यरात्री १२ वाजल्यापासून सोमवारी सकाळी आठपर्यंत कडक संचारबंदी असून या कालावधीमध्ये मेडिकल दुकाने, दवाखाना वगळता संपूर्ण बाजारपेठ बंद राहणार आहे अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी राऊत यांनी दिली.
कोरोना पार्श्वभूमीवर राज्य सरकारने ३० एप्रिलपर्यंत कडक निर्बंध राज्यात लावले आहे. विकेंडला म्हणजे शनिवार, रविवार अत्यावश्यक सेवा वगळता सर्वत्र संचारबंदी लावली आहे. या अनुषंगाने बीड जिल्ह्यातही मेडिकल दुकाने, दवाखाने वगळता सर्व बंद ठेवण्यात येणार आहे. या कालावधीमध्ये जिल्ह्यातील वाहतुक व्यवस्थाही बंद राहणार आहे.
मात्र जिल्ह्यातून इतर जिल्ह्यात प्रवास करणारी वाहने यांना यातून वगळण्यात आलेली आहे. शनिवार, रविवार सोडता संचारबंदी नव्हती. मात्र शनिवार, रविवार विकेंडला राज्य सरकारने संचारबंदी जाहिर केलेली आहे. त्याची कडक अंमलबजावणी महसूल आणि पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात येणार आहे. या कालावधीमध्ये रूग्णांना दवाखान्यात जाण्यासाठी सूट दिली जाणार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा