Breaking

शनिवार, १७ एप्रिल, २०२१

जनतेच्या आशीर्वादाने पद मिळाले त्यातून उतराई होत आहे - उपाध्यक्ष प्रदीप विधाते*




जनतेच्या आशीर्वादाने पद मिळाले त्यातून उतराई होत आहे - उपाध्यक्ष प्रदीप विधाते*  
वडूज प्रतिनिधी / शरद कदम 

            आजपर्यंत राजकारणात पक्षाने मला विविध पदावर काम करण्याची संधी दिली. मला हे पद केवळ जनतेच्या आशीर्वादाने मिळालं आहे. याचा मला कधी विसर पडलेला नाही. जनतेच्या या ऋणातून उतराई होण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करून लोकांना दिलेला शब्द पूर्ण करत असल्याचे प्रतिपादन सातारा जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदीप विधाते यांनी केले.
        कटगुण (ता.खटाव ) येथील आमदार शशिकांत शिंदे व प्रदीप विधाते यांच्या फंडातून श्री चिलाई देवी मंदिराच्या सभा मंडपासाठी १० लाख व मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कामासाठी ३ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेल्या विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले त्या प्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी सरपंच जयश्री कदम,उपसरपंच जयदीप गायकवाड,पंचायत समिती उपसभापती संतोष साळुंखे, रमेश शिंदे, माजी सरपंच उदय कदम, बाळासाहेब अभंग, महेश गायकवाड व ग्रामस्थ उपस्थित होते. श्री विधाते पुढे म्हणाले, आमदार शशिकांत शिंदे व पक्षातील वरीष्ठांनी माझ्यावर टाकलेल्या विश्वास मी नेहमी सार्थकी लावत आलो आहे.आजपर्यंत सर्वसामान्यांच्या, शेतकर्यांच्या समस्या सोडवितांना पक्षाने मला ताकद दिली याचा मला सार्थ अभिमान वाटतो. कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे बराचसा निधीचा उपयोग विकास कामांकडे वळवता आला नाही. तरीही जनतेच्या जास्तीत जास्त समस्या मार्गी कशा लागतील यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. कोरोना संदर्भात बोलताना श्री विधाते म्हणाले, येणारे पंधरा दिवस कुटुंबासाठी, गावासाठी व तालुक्यासाठी खुप महत्वाचे आहेत. त्यामुळे प्रत्येक नागरिकांनी या संदर्भात काळजी घेणे गरजेचे आहे. विशेषतः गर्दी टाळावी, मास्कचा वापर करावा व गावोगावच्या युवकांनी वाढदिवसाचा केक कापण्यासाठी समुहाने गोळा होणे टाळावे असे आवाहन त्यांनी केले. 
फोटो ओळीः
कटगुणः आमदार शशिकांत शिंदे व जिल्हा परिषद उपाध्यक्ष प्रदीप विधाते यांच्या फंडातून मंजूर झालेल्या विकास कामांचे भूमिपूजन करताना प्रदीप विधाते, सरपंच जयश्री गोरे ,उपसरपंच जयदीप गायकवाड व अन्य पदाधिकारी.   ( छाया - राजेंद्र शिंदे )

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा