कुर्डुवाडीत वाढत्या कोरोनो रुग्ण वाढीला बेकायदेशीर "खाजगी लॅब"चा पूरेपूरहातभार?*
*खाजगी लॅबवाल्यांचा वैद्यकीय क्षेत्राला हाताशी धरून उखळ पांढरे करण्याचा निंदनीय प्रकार...*
*प्रचंड अर्थपूर्ण खुळखुळीत नियम धाब्यावर...लाजाच सोडल्या*
*अधिका-यांची अक्षम्य डोळेझाक...कसा होणार कोरोनो कमी? नागरिकांचा उपचाराविना पडतोय खच...*
**********************************************
*✒️ AJ 24 Taas News स्पेशल रिपोर्ट
कुर्डुवाडी अरुण कोरे/पत्रकार यांजकडून...*
*कुर्डुवाडी शहरांत कोरोनोच्या विस्फोटक परिस्थितीतीत खाजगी लॅबवाल्यांनी सिव्हील सर्जनची परवानगी नसताना पैशासाठी प्रचंड धुमाकूळ घातलायाचे समोर आले असून शासकीय पातळीवर चौकशी करून संबंधितांवर फौजदारी दाखल करावेत अशी मागणी नागरिकांत जोर धरू लागल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.*
*याबाबत सोलापूर सिव्हील हॉस्पिटलमध्ये चौकशी करता असे समजते की,*
*कुर्डुवाडी शहरात अॅन्टीजन व आर.टि.पी.सी.आर.टेस्टची अधिकृत परवानगी श्री.क्लिनिकल,लॅबोरेटरी,*
*संतोष हाॅस्पीटल,टेंभुर्णी रोड,कुर्डुवाडी यांनाच दिलेली आहे.*
*मग महत्वाचा असा प्रश्न उपस्थित झाला आहे की,जर अन्य पाच सहा लॅबोरेटरीना अधिकृत परवानगी नसताना त्या लॅबवाल्यांनी तपासण्याच्या नावाखाली बेकायदेशीररित्या धुमाकूळ कसा घातला आहे?*
*याबाबत खोलवर माहिती घेतली असता असे निदर्शनास आले आहे की,खाजगी डॉक्टर्सच आपल्या "टक्केवारीची मलई" लाटण्यासाठी या लॅबोरेटरीना अधिकृत परवानगी नसताना तपासण्यासाठी रेफर करीत आहेत.*
*अन् शासन मान्यता परवानगी नसताना सर्व नियम धाब्यावर बसवून केवळ पैसा लाटण्यासाठी बेकायदेशीर तपासण्या करून रुग्णांकडून प्रचंड लूट करीत आहेत.*
*या बाबतींत आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे की,रॅपीड अॅन्टीजन टेस्ट करण्याची परवानगी सिव्हील सर्जनच्या परवानगी शिवाय व शासकीय पातळीवरही कुणालाच नाही.*
*असे असताना शासन मान्यता नसलेल्या लॅबवाल्यांनी खासगी लॅबोरेटरीना करारपत्र करुन नियम धाब्यावर बसवून जे बेकायदेशीर तपासण्या करीत आहेत.त्यावर शासकीय पातळीवर नियंत्रण कोणाचे?*
*या खाजगी लॅबवाल्यांनी पुण्या-मुंबईच्या लॅबवाल्यांशी करार झाल्याचे सांगितल्यावर अॅन्टीजन टेस्ट करण्याची परवानगी नसताना मग शेंकडों (हजारो?) अॅन्टीजन कीट कुर्डुवाडीच्या विनापरवाना लॅबवाल्यांनी मागवून त्याचे काय केले?याचे कुणीही समर्पक उत्तर द्यायला तयार नाही.तसेच त्या किटचे काय झाले हेही गौडबंगालच*
*कुर्डुवाडी शहरांत अधिकृत अॅन्टीजन व आर.टी.पी.सी.आर. तपासण्यांची परवानगी कुणाला आहे?हे सर्व डॉक्टर्सना माहीत असूनही त्यांना व शासकीय पातळीवरील यंत्रणांना डावलून, विनापरवाना लॅबवाल्यांना तपासण्यासाठी बेकायदेशीर कसे रेफर करीत आहेत.?लॅबवाले कोणत्याही नियमांचे पालन न करता मनमानी लूट करीत असून नियमानुसार तपासण्या, काॅरंटाईन,हाॅस्पिटिलायझेशन आदी कोणत्याच बाबींची पूर्तता करीत नसल्याचे दिसून येते.*
*दारुगुत्यासारखच...बेकायदेशीरला...बेजबाबदार पाठीशी घालणारे.. हप्ता बंदीत...मी आहे की...चालव...बघू पुन्हाच्या पुन्हा...*
*जर तपासणी पाॅझीटीव्ह आला तर रिपोर्ट आल्यावर बघू... म्हणून हात वर काढ पैसे... अन् रुग्ण गावभर वा-यावर....अन "निगेटिव्ह" आला तर काड दुप्पट...मग ती अॅन्टीजन की आर.टी.पी.सी.आर.हे गुफ्तगू त्यांनाच माहीत... कोरोनोच्या भितीत तेरी भी चूप मेरी भी चूप...*
*असे असले तर त्यांचे "अर्थपूर्ण मलई लाटण्याचा"हेतूही स्पष्टपणे उघड उघड दिसून येत आहे."विनापरवाना लॅबवाले अन् काही डॉक्टर्स" यांची कोरोनो महामारीतही "लुटारूंची टोळी" तर निर्माण झाली नाही ना?असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांबरोबरच खाजगी व सरकारी वैद्यकीय क्षेत्रातही उघड उघड विचारला जातो आहे.*
*वरिष्ठ अधिकाऱ्यांसह कुणाकुणाचे लागेबांधे कोरोनाच्या महामारीत अडकलेले आहेत याची पोलखोल सविस्तर माहिती यथावकाश मिळेल तशी जाहीर होईलच.*
*येनकेन मार्गाने कोरोनो महामारीत तरी सर्वसामान्य नागरिकांना लुटण्याचा धंदा बंद करा अशी सर्वसामान्य नागरिकांबरोबरच खाजगी व सरकारी वैद्यकीय क्षेत्रातही दबक्या आवाजात पण उघड उघड मागणी केली जात आहे.*
*याबाबत विनापरवाना लॅबवाल्यांशी संपर्क साधला असता त्यांना सिव्हील सर्जनची अथवा शासकीय पातळीवर कोणतीही परवानगी नसल्याचे सर्वांनी (एक वगळता) कबूल केले आहे.तसेच ज्या खासगी लॅबोरेटरी बरोबर करार केला आहे त्यांचेकडे चौकशी करून कळवतो अन्यथा आम्ही आमच्या लॅबमधील तपासण्या बंद करतोय असेही त्यांच्याकडून सांगण्यात आले.*
*"बेकायदेशीरपणे दारुगुत्या"सारख्या वैद्यकीय क्षेत्रातही चाललेल्या बेकायदेशीर कृत्याबाबत नागरिकांत तिव्र संताप व्यक्त केला जात आहे.*
*जर विनापरवाना बेकायदेशीर तपासणी होत असेल तर तातडीने बंद करा अन्यथा त्यांची चौकशी करून दोषींवर फौजदारी दाखल करण्यात यावी अशी मागणी नागरिकांच्या व रुग्णांच्या वतीने ज्येष्ठ पत्रकार अरुण कोरे यांनी वरिष्ठांकडे केली आहे.*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा