*इंदापूर तालुक्यात रविवारी रुग्णसंख्येची शंभरी पार, दिवसात ११८ पॉझिटिव्ह.
————————————————————————
इंदापूर प्रतिनिधी- आदित्य बोराटे
इंदापुर तालुक्यात दि.४ एप्रिल २०२१ अखेर ६ हजार ५७२ रूग्ण पाॅझीटीव्ह आढळले असुन,५ हजार ७९० रूग्णं बरे झाले आहेत.तर १५३ रूग्णं मयत झाले असुन मृृृत्युचा दर २.३३ टक्के इतका आहे. रूग्ण बरे होण्याचे प्रमाण ८८ टक्के इतके आहे.सध्या ६२९ रूग्ण तालक्यात पाॅझीटीव्ह असुन त्यांच्यावर इंदापूर व इतर हाॅस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. ४ एप्रिल रोजी ४०२ संशयीतांची आंटिजन टेस्ट करण्यात आली, त्यामध्ये ७३ रूग्ण पाॅझीटीव्ह आढळले.तर ६१ जणांची आरटीपीसीआर टेस्ट करण्यात आली त्यामध्ये २७ जण पाॅझीटीव्ह आले.व बाहेरगावी खासगी रूग्णांलयामध्ये १८ जण पाॅझीटीव्ह आल्याने रविवारी एकुण ११८ रूग्ण पाॅझीटीव्ह आढळुन आले.
यामध्ये इंदापूर शहर १९, शिरसोडी १७, जंक्शन १०, निमगाव केतकी ८, भिगवण ७, पळसदेव ६, वालचंदनगर ४, वडापुरी ४,मदनवाडी ०३, कुरवली ०१, बील्टकंपनी २, काझड १,शहा १, कालठण नं.१. १, बोरी १, चांडगाव १, गलांडवाडी नं.१, अकोले १, कांदलगाव १, व्याहळी १, गोतोंडी १, पिंपरी खु.२,वरकुटे खु.२, माळवाडी नं.१.१, हिंगणगाव १, चिंदादेवी २, भांडगाव १, बेडशिंगे १, भरणेवाडी २, पडस्थळ २, कळस १, सराफवाडी १, शेळगाव १, अंथुर्णे २, विठ्ठलवाडी १, रेडा १, पिंपळे १, भिगवन स्टे.१, डिकसळ १, निंबोडी १, आनंदनगर १ असे एकुण ११८ जण पाॅझीटीव्ह आले असल्याची माहीती आरोग्य विभागाकडुन देण्यात आली आहे.
————————————————————————
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा