*माळशिरस तहसील कार्यालयासमोर माहिती सेवाभावी संस्था यांचे स्वस्त धान्य दुकानदार यांच्या मनमानी कारभारा विरोधात बेमुदत आमरण उपोषण*
माळशिरस धनंजय थोरात
शासकीय धान्याची पावती न देणे व कमी प्रमाणात धान्य देणे असे प्रकार रेशन दुकानदार करीत असल्याची तक्रार दहिगाव परिसरातील ग्रामस्थांनी सामाजिक संघटनेकडे केली असल्याने
माळशिरस तालुक्यातील दहिगाव येथील शासकीय स्वस्त धान्य दुकान आहे.या दुकानदाराकडून वितरित करण्यात आलेल्या धान्याची पावतीच देत नसल्याचे तसेच शिधापत्रिका शोधमोहीमेसाठी ग्रामपंचायत थकबाकी नसलेला दाखला बंधनकारक करून नागरिकांची आर्थिक फसवणूक केली आहे असे निवेदनात म्हटले असून दिलेले धान्य कमी प्रमाणात देत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे कोरोना या संसर्गजन्य महामारीच्या काळात केंद्र व राज्य शासनाने दिलेल्या धान्यबाबत माहिती मिळत नाही,या भयानक काळात रोजगार नाही,त्यामुळे शासकीय
मदतीवरच गोरगरीब अवलंबूनआहे.रेशनदुकानदार याच्या या वागणुकीमुळे उपासमारीची वेळ आली आहे.शासनानेच कमी धान्य दिल्यामुळे मी कमी प्रमाणात देत असून तुम्ही शासनाला जाब विचारला पाहिजे असे काही दुकानदार यांचे म्हणणे आहे, शासकीय नियमानुसार धान्य न मिळाल्यास व या प्रकरणी चौकशी संपूर्ण दप्तर व दुकानदाराची सखोल चौकशी करून फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा या मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य सरचिटणीस धनंजय थोरात व पश्चिम महाराष्ट्र संघटक महेंद्र साठे यांनी हे उपोषण केले होते. लोकशाही मार्गाने माळशिरस तहसील कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण करण्यात आले. यावेळी बोलताना पुरवठा अधिकारी यांनी सांगितले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा