माढा,कुर्डूवाडी व टेंभूर्णी येथे सुरू होणार कोव्हीड सेंटर - आ.बबनराव शिंदे
बेंबळे। प्रतिनिधी।
सध्या देशभरात व राज्यामध्ये कोव्हीड-19 ची दूसरी लाट आलेली असून सोलापूर जिल्ह्यामध्ये कोरोना बाधीत रूग्ण संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याने माढा मतदारसंघातील माढा, कुर्डूवाडी व टेंभूर्णी येथे कोरोनाग्रस्त रुग्णांसाठी कोव्हीड सेंटर सुरू करण्यास परवानगी मिळाली असल्याची माहीती आ.बबनराव शिंदे यांनी दिली.
अधिक माहीती देताना आ.बबनराव शिंदे म्हणाले की, सध्या देशभरामध्ये कोव्हीड-19 ची दूसरी लाट आलेली असून रूग्ण संख्खेत दिवसेनदिवस वाढ होत आहे. आपले राज्यामध्ये कोरोना बाधीत रूग्ण संख्खा वाढत असून आपले सोलापूर जिल्ह्यामध्येही त्याचा प्रभाव वाढत आहे. माढा तालुका व माढा मतदारसंघातील कांही गावांमध्ये रूग्ण संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली असून कोरोना बाधीत रूग्णांवर योग्यवेळी उपचार होणेच्या दृष्टीने माढा,कुर्डूवाडी व टेंभूर्णी या ठिकाणी कोव्हीड सेंटर सुरू करण्यास जिल्हाधिकारी सोलापूर यांचेकडून परवानगी मागणी केलेली होती. त्यानुसार शासकीय वसतिगृह माढा, शासकीय वसतिगृह कुर्डूवाडी व संकेत मंगल कार्यालय,टेंभूर्णी येथे कोव्हीड सेंटर सुरू करण्यास परवानगी मिळालेली असून येत्या दोन दिवसात या तीनही ठिकाणी कोव्हींड सेंटर सुरू होणार आहेत. सध्या माढा तालुक्यातील रोपळे(क), मानेगांव, उपळाई बु, मोडनिंब, परिते , पिंपळनेर,टेंभूर्णी, आलेगांव बु या सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत येणा-या गावासह माढा ग्रामीण रूग्णालय, कुर्डूवाडी ग्रामीण रूग्णालय या ठिकाणी एकत्रित मिळून 500 पेक्षा जास्त ॲक्टीव्ह रूग्ण आहेत. या रूग्णांवर कोव्हीड सेंटरच्या माध्यमातून कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार करणे सुलभ होणार आहे. मागील वर्षी देखील माढा, कुर्डूवाडी, टेंभूर्णी, महाळुंग व इतर ठिकाणी कोव्हीड सेंटर सुरू करून बाधीत रूग्णांवर उपचार करण्यात आलेले आहेत अशी माहीती आ.शिंदे यावेळी दिली.
तसेच नागरिकांनी कोरोना या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे. तसेच मास्क, हॅन्ड सॅनिटायझर व सुरक्षित अंतर या बाबींचे कटाक्षाने पालन करावे असे आवाहन आ.शिंदे यांनी केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा