Breaking

मंगळवार, २७ एप्रिल, २०२१

उजनी धरणाच्या पाणीप्रश्नावर प्रहार संघटना आंदोलन उभा करणार---जिल्हाप्रमुख दत्ता मस्के पाटील*




*उजनी धरणाच्या पाणीप्रश्नावर प्रहार संघटना आंदोलन उभा करणार---जिल्हाप्रमुख दत्ता मस्के पाटील*
टेंभुर्णी प्रतिनिधी/अमोल भोसले यास कडून

सोलापूर जिल्ह्यातील प्रहार सैनिक आणि शेतकऱ्यांना आवाहन करतो कि सध्या सोलापूर जिल्ह्यातील वरदायनी उजनी धरणाच्या विषयीचा पाणी प्रश्न पेटला असून अनेक नेते मंडळी या पाणीप्रश्नावर आवाज उठवताना दिसत आहे त्यांचं सर्वांचं कौतुकच आहे.
   गेल्या पाच वर्षापासून सोलापूर जिल्ह्यातील प्रहार संघटना आणि त्यांचे सर्व प्रहार सैनिक वंदनीय राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू यांच्या मार्गदर्शनात शिस्तबद्ध पद्धतीने अन्यायाच्या विरोधात पेटून उठत आहेत आणि आत्ता ही जर पाणी प्रश्नाच्या बाबतीत सोलापूर जिल्ह्यावर अन्याय झाला असेल तर प्रहार संघटना गप्प बसणार नाही.
   परंतु महाराष्ट्र शासनाने दोन तारखेपर्यंत केलेल्या लॉक डाऊन मुळे आणि सध्या दररोज शेकडो लोकांचे मृत्यू सोलापूर जिल्ह्यात होत असून आपली जबाबदारी आपण पार पाडून लोकांच्या मदतीला मग ते कोविंड पेशंट असतील किंवा त्यांचे नातेवाईक असतील त्यांना मदत करण्याचे काम प्रहार संघटना करत आहे.
   परंतु येत्या दोन तारखेनंतर सोलापूर जिल्ह्यातील तमाम प्रहार सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक सोलापूर रेस्ट हाऊस येथे लावून आणि पाणी प्रश्नाची शहानिशा करून, खरंच पालक मंत्री दत्ता मामा भरणे यांनी पाणी कस आणि कोणासाठी न्हेल याची शहंशा करून स्वतःच्या ताकतीवर आणि शेतकऱ्यांच्या मदतीने  सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी हितासाठी प्रहार स्टाईलने आंदोलन उभा करेल.
**********************
*जिल्हाध्यक्ष दत्तात्रय मस्के यांचा प्रहार संघटना सोडून गेलेल्यांना टोला*

 सोलापूर जिल्ह्यातील सर्व प्रहार चे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सूचना प्रहार संघटना ही स्वतंत्र आंदोलन उभा करायला पूर्णपणे सक्षम आहे आणि वेळोवेळी सोलापूर प्रहार ने दाखवून दिले आहे त्यामुळे कोणत्याही स्वयंघोषित शेतकरी नेत्याच्या नादी लागून चुकीचे पाऊल उचलू नये,पाणी प्रश्नाच्या बाबतीत आपण कोणत्याही नेत्याच्या सोबत राहण्यापेक्षा लोकांच्या सोबत राहून आंदोलन उभा करू. आणि जिल्ह्यातील सर्वांना माहीतच आहे एकदा प्रहार ने आंदोलन हातात घेतलं की विषय संपला.

*आपला विश्वासू*
*दत्ता मस्के पाटील*
*जिल्हा प्रमुख प्रहार सोलापूर..*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा