*पुसेसावळीचे माजी सरपंच सूर्यकांत कदम यांचा अटकपूर्व जामीन मंजूर*
वडूज प्रतिनिधी / शरद कदम
पुसेसावळी ता. खटाव येथील माजी सरपंच सूर्यकांत उर्फ बापू शंकर कदम यांचे विरुद्ध औंध पोलीस स्टेशन मध्ये ॲट्रॉसिटीचा आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल झालेला होता. त्या गुन्ह्यांमध्ये वडूज येथील जिल्हा न्यायाधीश मलाबादे साहेब यांनी सूर्यकांत कदम यांचा अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. कदम यांचा जामीन मंजूर होण्यासाठी खटाव तालुका मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक बाबा शिंदे व मराठा क्रांती मोर्चा टीमने खूप प्रयत्न केले. तसेच कदम यांच्या वतीने न्यायालयात अॅड. संतोष भोसले वडूज यांनी सत्य परिस्थिती कोर्टाच्या समोर मांडून कदम यांना जामीन मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
यावेळी अॅड.भोसले म्हणाले, की एखाद्या मराठा बांधवावरती अॅट्रासिटीच्या नावाखाली गंभीर गुन्हा दाखल होतो आणि त्या गुन्ह्यांमध्ये मराठा समाज हा खोट्या गुन्ह्याखाली दबला जातो. अशा वेळी मराठा बांधवाची निष्पाप भूमिका न्यायालयासमोर मांडून योग्य न्याय मिळतो त्या वेळेस आपला उर भरून येतो व आपणही आपल्या समाजासाठी खारीचा वाटा उचलेला आहे असे मनोमन वाटते. या केसमध्ये कदम यांना अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी प्रयत्न केल्याबद्दल मराठा क्रांती मोर्चा टीम व अॅड. संतोष भोसले यांचे वडूज परिसरासह खटाव तालुक्यातील मराठा समाजाकडून अभिनंदन होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा