Breaking

बुधवार, १४ एप्रिल, २०२१

तुळजाभवानी महाविद्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन



तुळजाभवानी महाविद्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन



तुळजापूर तालुका प्रतिनिधी/ रुपेश डोलारे उस्मानाबाद


तुळजापूर,दि.१४, येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित तुळजाभवानी महाविद्यालय तुळजापूर येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमापूजन करुन अभिवादन करण्यात आले.सदर प्रतिमा पूजन प्रा.सतिश वडगावकर यांच्या हस्ते संपन्न झाले.याप्रसंगी ग्रंथपाल दिपक निकाळजे,प्रा.आशपाक आतार,प्रा.सतिश घाडगे ,प्रा.धनंजय लोंढे प्रा.डॉ.नेताजी काळे,प्रा.गोकुळ बाविस्कर,प्रा.बाळासाहेब कुकडे,प्रा.विवेकानंद चव्हाण यांची उपस्थिती होती.यावेळी कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर सर्व योग्य ती खबरदारी घेण्यात आली,सदर कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस एम मणेर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.

प्रतिनिधी रुपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा