*सौताडा धबधब्यात उडी मारून विद्यार्थिनीची आत्महत्या*
बीड जिल्हा प्रतिनिधी- नवनाथ आडे
बारावी वर्गात शिकत असलेल्या एका 17 वर्षीय मुलीने सौताडा येथील धबधब्यात उडी मारून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली.
सदर घटनेची माहिती पाटोदा पोलीसांना मिळताच घटनास्थळी पोलीसांनी धाव घेऊन मृतदेह शवविच्छेदना-साठी पाटोद्याच्या रुग्णालयात दाखल केला.
शुभांगी लक्ष्मण शिंदे (वय 17) राहणार सौताडा ही बारावी वर्गाची मुलगी काल रात्री अचानक घरातून निघून गेली होती. रात्री उशिरापर्यंत तिचा शोध नातेवाईकांनी घेतला मात्र ती सापडली नाही. सकाळी सौताडा येथील धबधब्यात तिचा मृतदेह आढळून आला. तिने रात्रीच धबधब्यावरून उडी मारली असावी. त्यात गंभीर जखमी होऊन तिचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
घटनास्थळी पाटोदा पोलीस ठाण्याचे तांबे व तांदळे यांनी भेट देऊन पंचनामा केला आहे.
याविषयी चा अधिक तपास पोलीस ठाण्याचे तांबे व तांदळे हे पोलीस कर्मचारी करत आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा