Breaking

शुक्रवार, २ एप्रिल, २०२१

*अ‍ॅड,झिनत प्रधान, जिल्हाअध्यक्षा वंचित बहुजन महिला आघाडी, उस्मानाबाद यांची तळणी ता, रेणापूर जिल्हा लातुर येथील पीडित गायकवाड कुंटुंबास भेट*



*अ‍ॅड,झिनत प्रधान, जिल्हाअध्यक्षा वंचित बहुजन  महिला आघाडी, उस्मानाबाद यांची तळणी ता, रेणापूर जिल्हा लातुर येथील पीडित गायकवाड  कुंटुंबास भेट*

            समिक्षा राहुल गायकवाड या बौद्ध मुलीने गावातील गावगुंडाच्या त्रासास कंटाळून दि. 25/3/2021 रो जी आत्महात्या केली . सबब सदरील प्रकरणी वंचित बहुजन आघाडीच्या उस्मानाबाद जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्षा ॲड.जीनत प्रधान यांच्या नेतृत्वाखालील टिमने तळणी तालुका रेनापुर जिल्हा लातूर या गावात समक्ष भेट दिली . या मधे बाबासाहेब जानराव,जिल्हामहासचिव, उस्मानाबाद, विद्यानंद  वाघमारे, जिल्हा कार्यकारिणी सदस्य, वंचित बहुजन आघाडी, उस्मानाबाद वैभव कांबळे, जिल्हाऊपाध्यक्ष, अ‍ॅड. विठ्ठल खोडके, विधि सल्लागार, निकेश आचार्य, सुयोग आचार्य, वंचित  बहुजन आघाडी, लातूर कृष्णा वाघमारे, तालुकाध्यक्ष भारिप बहुजन महासंघ, रेणापूर यांनी रेणापूर तालुक्यातील मौजे. तळणी या गावी पिडीत  गायकवाड कुटुंबीयास भेट दिली, व गायकवाड कुटुंबियांची अस्थेवाईकपणे विचारपूस करून धिर दिला तसेच वंचित बहुजन आघाडी आपणास सर्वतोपरी सहकार्य करण्यास तयार असून आपल्या पाठिशी खंबीरपणे उभी आहे तसेच आपणास  न्याय मिळवून देण्यासाठी तत्पर आहे. असे सांगून धीर दिला . व प्रकरण सध्य स्थितिचा आढावा घेतला .

प्रतिनिधी रूपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा