Breaking

मंगळवार, १३ एप्रिल, २०२१

वडूजमध्ये वयोवृध्दाचा बटवा मारणाऱ्या चोरट्यास अटक, गुन्हा दाखल*

वडूजमध्ये वयोवृध्दाचा बटवा मारणाऱ्या चोरट्यास अटक, गुन्हा दाखल*
वडूज प्रतिनिधी / शरद कदम 

       वडूज ता. खटाव येथील वयोवृद्ध आत्माराम दाजी गुजले वय वर्ष १०६ हे आपल्या घरासमोरील कट्टयावर बसले असताना संध्याकाळी ६ च्या दरम्यान एक २२ ते २५ वयाचा सडपातळ बांध्याचा, काळ्या रंगाचा अनोळखी मुलगा येऊन त्याने आपल्या जवळील असलेली चटणी आत्माराम गुजले यांच्या डोळ्यात टाकून व चप्पलने डोक्यात मारहाण करून गुजलेंच्या कमरेला असलेल्या बटव्यातील त्यामध्ये सोन्याच्या प्रत्येकी ५ ग्रॅमच्या दोन बोरमाळा असा एकूण १० ग्रॅम वजन असलेला बटवा चोरट्याने जबरदस्तीने चोरून नेला याबबतची तक्रार आत्माराम गुजले यांनी वडूज पोलीस ठाण्यात दिली .     
        सदरचा गुन्हा दाखल झालेनंतर सपोनि मालोजीराव देशमुख यांनी तपासपथक तयार करून अज्ञात आरोपीचा व चोरीस गेलेल्या सोन्याच्या दागिन्याचा शोध घेत असताना फिर्यादी आत्माराम गुजले यांनी सांगितलेल्या वर्णनावरून आरोपीस संशयावरून वैभव सत्यवान लगाडे वय वर्ष २० रा.वडूज ता.खटाव यास तात्काळ ताब्यात घेऊन गुन्हयाचा तपास करण्याकामी अटक करण्यात आली. सदर गुन्हयातील चोरीस गेलेल्या सोन्याच्या दोन बोरमाळा तपासकामी हस्तगत करण्यात आल्या आहेत.
         मागील काही दिवसापासून वडूज परिसरात चोरीच्या प्रमाणात वाढ झाल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण झाले होते. अशाच प्रकारचे चोरीचे प्रकार घडल्यास न घाबरता तात्काळ पोलीस ठाणेस कळविणेबाबत सपोनि मालोजीराव देशमुख यांनी आवाहन केले आहे.
        सदरची कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि मालोजीराव देशमुख, पोलीस नाईक शिवाजी खाडे, राहूल सरतापे, रेश्मा भोसले, पोलीस कॉ. दिपक देवकर, अण्णाराव मारेकर, दऱ्याबा नरळे, संदीप शेडगे, सागर बदडे यांनी केली. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरिक्षक शहाजी गोसावी करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा