पंढरपूर व माळशिरस तालुक्यातील रस्ते दुरुस्तीसाठी 2 कोटी निधी मंजूर- आ.बबनदादा शिंदे
जिल्हा वार्षीक योजना अंतर्गत 3054 व 5054 योजनेतून अतिवृष्टीने खराब झालेल्या रस्त्यांसाठी पंढरपूर व माळशिरस तालुक्यांतील रस्त्यांसाठी 2 कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहीती आ.बबनदादा शिंदे यांनी दिली.
अधिक माहीती देताना आ.शिंदे म्हणाले माढा मतदारसंघात समाविष्ठ पंढरपूर व माळशिरस तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांचा सामावेश असून मंजूर रस्ते पुढीलप्रमाणे.
यामध्ये पंढरपूर तालुक्यातील 3054 अंतर्गत 1) खेड-भोसे ते दडगळ वस्ती रस्ता रक्कम रु. 22 लाख, 2) देवडे ते प्रजिमा 81 ला मिळणारा रस्ता (देवडे पाटी) रक्कम रु. 25 लाख, व 5054 अंतर्गत 1) राज्यमार्ग ते चिलाईवाडी रस्ता रक्कम रु. 15 लाख, 2) व्होळे ते कोक नदी रस्ता रक्कम रु. 11 लाख, 3) करोळे ते कान्हापूरी रस्ता रक्कम रु. 24 लाख, 4) सुस्ते ते देशमुख वस्ती रस्ता रक्कम रु. 10 लाख, तसेच माळशिरस तालुक्यातील 1) जांभुड ते मिरे रस्ता रक्कम रु. 15 लाख, 2) माळखांबी विठ्ठलवाडी ते लोखंडे वस्ती रस्ता रक्कम रु. 15 लाख, 3) उजनी कॅनॉल ते घरमालकर ,भिलारे , वाघ वस्ती रस्ता रक्कम रु. 15 लाख, 4) महाळुंग ते तांबवे रस्ता रक्कम रु. 15 लाख, 5) महाळुंग हदके वस्ती ते मुंडफणे मळा रस्ता रक्कम रु. 15 लाख,
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा