Breaking

मंगळवार, ११ मे, २०२१

उंबरेच्या आरोग्य केंद्रात जिल्ह्यातील पहिले 20 ऑक्सिजन बेडयुक्त कोव्हिड सेंटर सुरू - रणजितसिंह शिंदेआमदार बबनदादा शिंदे यांनी दिला होता 15 लाख रुपयांचा निधी


उंबरेच्या आरोग्य केंद्रात जिल्ह्यातील पहिले 20 ऑक्सिजन बेडयुक्त कोव्हिड सेंटर सुरू - रणजितसिंह शिंदे 

आमदार बबनदादा शिंदे यांनी दिला होता 15 लाख रुपयांचा निधी 

माढा / प्रतिनिधी - माढा विधानसभा मतदारसंघातील पंढरपूर तालुक्यातील उंबरे-पागे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सोलापूर जिल्ह्यातील पहिले 20 ऑक्सिजन बेडयुक्त कोव्हिड सेंटर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बबनदादा शिंदे यांनी दिलेल्या 15 लाख रुपयांच्या निधीतून सुरू करण्यात आले असून भविष्यात जर कोरोना रुग्णांची संख्या वाढली तर मागणीनुसार आणखी सहकार्य करण्याचे आश्वासन जिल्हा परिषद सदस्य रणजितसिंह शिंदे यांनी दिले.

ते उंबरे ता.पंढरपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सुरू केलेल्या कोव्हिड सेंटरच्या उद्घाटनप्रसंगी मंगळवारी बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोलापूर जिल्ह्याचे आरोग्य अधिकारी डॉ.शीतलकुमार जाधव होते.

पुढे बोलताना रणजितसिंह शिंदे म्हणाले की, सध्या माढा विधानसभा मतदारसंघात विविध ठिकाणच्या कोव्हिड सेंटर व शासकीय रुग्णालयात 800 बेडची सुविधा उपलब्ध झाली आहे लवकरच माढा तालुक्यातील आलेगाव बुद्रुक व पंढरपूर तालुक्यातील रोपळे व तुंगत याठिकाणी आमदार बबनदादा शिंदे यांच्या फंडातून प्रत्येकी 10 ऑक्सीजन बेडयुक्त कोव्हिड सेंटर सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.या सर्व ठिकाणी लागणाऱ्या आरोग्य विषयक सुविधा,गोळ्या औषधे इतर साहित्यांचा पुरवठा मागणीनुसार करण्यात येईल. हे अद्ययावत कोव्हिड सेंटर सुरू केल्यामुळे या भागातील 20 ते 25 गावातील लोकांना याचा लाभ घेता येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

याप्रसंगी गटविकासाधिकारी रविकिरण घोडके, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.एकनाथ बोधले, डॉ.भाऊसाहेब जानराव,डॉ.साखरे मॅडम,आरोग्य सहाय्यक एस टी काझी,विठ्ठलराव शिंदे कारखान्याचे संचालक पोपट चव्हाण,सरपंच महादेव शिंदे,उपसरपंच नागनाथ कानगुडे,ज्ञानदेव ढोबळे,सचिन हिंदोळे,हरी कानगुडे,परमेश्वर लोंढे,प्रेम चव्हाण,पोपट फराडे यांच्यासह ग्रामस्थ व प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी उपस्थित होते.

फोटो ओळी - उंबरे ता.पंढरपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सेंटरचे उद्घाटन करताना जि.प.सदस्य रणजितसिंह शिंदे,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शीतलकुमार जाधव व इतर मान्यवर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा