जनसुविधा योजनेतून माढा मतदारसंघात 31 गावासाठी 1 कोटी 23 लाखांचा निधी मंजूर - रणजितसिंह शिंदे
माढा / प्रतिनिधी - जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जनसुविधा योजनेतून सन 2020 -21 करिता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बबनराव शिंदे व जिल्हा परिषद सदस्यांच्या प्रयत्नातून माढा विधानसभा मतदारसंघातील माढा तालुक्यातील विविध 31 गावासाठी 1 कोटी 22 लाख 75 हजार रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती जिल्हा परिषद सदस्य रणजितसिंह शिंदे यांनी दिली आहे.
या निधीतून हायमास्ट दिवे बसविणे,स्मशानभूमी परिसरात सिमेंट काँक्रिटीकरण व सुशोभीकरण करणे,शिव रस्ते व वस्त्या कडे जाणारे रस्ते खडीकरण व मजबुतीकरण करणे,ग्रामपंचायत कार्यालय नूतनीकरण व पेव्हिंग ब्लॉक बसविणे, विविध मंदिरासमोर पेव्हिंग ब्लॉक बसविणे,पुरात वाहून गेलेले विविध गावातील रस्ते करणे, स्मशानभूमी व दफनभूमी बांधणे,त्याभोवती वॉल कंपाऊंड बांधणे,स्मशानभूमीकडे जाणारे रस्ते मजबुतीकरण करणे संरक्षक भिंत बांधणे,स्मशानभूमी जोड रस्त्यावर ओढ्यावर फुल बांधणे आदी कामांसाठी हा निधी मंजूर केला आहे.
हा निधी मंजूर झालेल्या 31 गावांमध्ये
शिराळ (मा.) 5.5 लाख,वडाचीवाडी (उ. बु) 3 लाख,बावी 7 लाख,रांझणी 5 लाख, भिमानगर 5 लाख,चांदज 7 लाख,वडशिंगे 5 लाख,उंदरगाव 2.5 लाख,अंजनगाव उमाटे 2.5 लाख, दारफळ सीना 2.5 लाख,मानेगाव 2.5 लाख,कुंभेज 5.5 लाख, वडाचीवाडी (अं.उ.) 2.5 लाख, आढेगाव 5 लाख,परितेवडी 5 लाख, वरवडे 5 लाख,लऊळ 5 लाख, तुळशी 2.5 लाख,अकोले खुर्द 1.25 लाख,सापटणे (टें) 10 लाख, मिटकलवाडी 5 लाख,घोटी 4 लाख, अकोले बुद्रुक 3 लाख,कापसेवाडी 2.5 लाख,महातपूर 3 लाख, सुलतानपूर 3 लाख,लोंढेवाडी 3 लाख,तांदळवाडी 2.5, रिधोरे 2.5 लाख,पापनस 2.5 लाख खैरेवाडी 2.5 लाख या गावांचा समावेश असल्याचे रणजितसिंह शिंदे यांनी सांगितले आहे.
फोटो ओळी - जि.प.सदस्य रणजितसिंह शिंदे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा