*माढा तालुका व विधानसभा मतदारसंघात पाच ठिकाणी लहान मुलांचे डेडिकेटेड कोव्हीड सेंटर सुरू करणार.
आ. बबनराव शिंदे यांची माहिती
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर लहान मुलांसाठी शंभर ऑक्सिजन बेडची व्यवस्था होणार .*
बेंबळे।प्रतिनिधी
सध्या देशामध्ये व राज्यामध्ये कोरोना या विषाणूची दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आला असून कोरोनाची संभाव्य तिसरी लाटेची प्रार्श्वभुमी विचारात घेऊन माढा तालुक्यात माढा, कुर्डूवाडी, टेंभूर्णी येथे तर माढा विधानसभा मतदारसंघातील करकंब ता. पंढरपूर व महाळुंग ता.माळशिरस या ठिकाणी लहान मुलांचे डेडिकेटेड कोव्हीड सेंटर सुरु करण्यात येणार असल्याची माहिती आ.बबनराव शिंदे यांनी दिली.
अधिक माहीती देताना आ.शिंदे म्हणाले की, सध्या राज्यामध्ये कोरोना विषाणूचा दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झालेला आहे तसेच कोरोना या विषाणूची संभाव्य तिसरी लाटेच्या पार्श्वभूमीवर जरुर ती उपाययोजना होण्याच्या दृष्टीने सतर्कता बाळगुण तिसरी लाट थोपविणे गरजेचे आहे. या तिसऱ्या लाटेमध्ये लहान बालके बाधित होण्याचा धोका असल्याचे तज्ञांचे मत आहे. त्यामुळे यावर तातडीने उपाययोजना होण्याच्या दृष्टीने आरोग्याची जरुर ती उपाययोजना व सुविधा प्रभाविपणे राबविणे आवश्यक आहे. याचा विचार करुन ग्रामीण रुग्णालय माढा, ग्रामीण रुग्णालय कुर्डूवाडी ता.माढा, ग्रामीण रुग्णालय करकंब ता.पंढरपूर व प्राथमिक आरोग्य केंद्र महाळुंग ता.माळशिरस, या शासकीय रुग्णालयात 50 ऑक्सिजन बेड तर कुर्डूवाडी येथील डॉ. बोबडे हॉस्पिटल, डॉ.साखरे हॉस्पिटल व डॉ.माने यशश्री हॉस्पिटल,टेंभुर्णी हे सर्व बालरोग तज्ञ डॉक्टर असून त्यांच्या खासगी हॉस्पिटलमध्ये 50 बेड तयार करून ठेवण्यात येणार आहेत शासकीय व खाजगी हॉस्पिटलमध्ये मिळून 100 ऑक्सिजन बेड असणार आहेत
*कोविड सेंटर मध्ये 300 बेड रिक्त*
सध्या तालुक्यातील विविध कोविड केअर सेंटर मध्ये 300 बेड रिकामे आहेत तर खाजगी हॉस्पिटलमध्ये 75 ऑक्सिजन बेड शिल्लक असून नागरिकांनी कोरोनाच्या आजाराला घाबरून न जाता उपचारासाठी पुढे यावे पॉझिटिव आलेल्या रुग्णांनी कोविड सेंटरमध्ये दाखल होऊन उपचार घ्यावेत त्यामुळे कुटुंबातील इतर सदस्य, लहान मुले व वयोवृद्ध व्यक्ती सुरक्षित राहतील याची काळजी घेणे आवश्यक आहे. शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन आमदार शिंदे यांनी केले आहे.
*तिसऱ्या लाटेसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज*
सुरुवातीच्या टप्प्यात शासकीय हॉस्पिटल व खाजगी हॉस्पिटल यामध्ये शंभर ऑक्सिजन बेडची व्यवस्था असलेली डेडिकेटेड कोव्हीड सेंटर सुर करण्यात येणार आहेत त्यामुळे संभाव्य तिसऱ्या लाटेवर प्रभाविपणे मात करणेस मदत होईल या कोव्हीड सेंटरमध्ये लहान मुलांसाठी स्वतंत्र खाटा राखीव ठेवणे, ऑक्सिजन, व इतर सर्व सोयी सुविधा उपलब्ध राहणार आहेत यामध्ये आणखी ऑक्सिजन बेडची गरज भासल्यास बेडची व्यवस्था करण्यात येणार आहे.मी सातत्याने प्रशासन व आरोग्य विभाग यांच्या संपर्कात असून कशाचीही कमतरता भासू नये यासाठी प्रयत्नशील असल्याचे आ.शिंदे यांनी यावेळी सांगितले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा