Breaking

शुक्रवार, २१ मे, २०२१

जिवंत काडतुसासह पिस्टल बाळगल्याप्रकरणी तिघांना अटक..5 दिवस पोलीस कोठडी. ***************************** फलटण शहर पोलीसांची कामगिर*



*जिवंत काडतुसासह  पिस्टल बाळगल्याप्रकरणी तिघांना अटक..5 दिवस पोलीस कोठडी*
***************************
*फलटण शहर पोलीसांची कामगिर*
****************************
AJ 24 Taas News Maharashtra
फलटण तालुका प्रतिनिधी/शरीफ काझी

जिवंत  काडतुसासह विनापरवाना पिस्टल बाळगल्याप्रकरणी तीन जणांना फलटण शहर पोलिसांनी अटक केली आहे. या तिघांना न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने त्यांना ५ दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे.
याबाबत फलटण शहर पोलीस ठाण्यामधून मिळालेल्या माहितीनुसार, फलटण शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भारत किंद्रे यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली कि, राजू राम बोके हा त्याच्या दोन साथीदारांसह एका मित्राला मोटार सायकलवरून भेटण्याकरीता येणार असून राजू राम बोके हा स्वत:जवळ बेकादेशीर पिस्टल (अग्नीशस्त्र) बाळगत आहे. मिळालेल्या माहितीनुसार तात्काळ दोन पंचाना बोलावून घेवून त्यांच्यासह फलटण शहर पोलीस स्टेशनचे पथक मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी सापळा लावून थांबलेले असताना १२:४५ वाजण्याच्या सुमारास एका मोटार सायकलवर बातमीत सांगितल्याप्रमाणे तिघेजण येताना दिसले. या तिघांना जागीच पकडून पोलीस निरीक्षक भारत किंद्रे यांनी त्यांची नावे विचारली असता त्यांनी त्यांची नावे राजू राम बोके (वय ३४, रा. मंगळवार पेठ, फलटण), दिलीप तुकाराम खुडे (वय ३२, रा. लक्ष्मीनगर, फलटण), मनोज राजेंद्र हिप्परकर (वय २७, रा. प्रेमलाताई हायस्कुलजवळ, मलटण) अशी सांगितली. त्यांची अंगझडती घेतली असता राजू राम बोके याच्या कमरेस एक पिस्टल खोवलेले दिसून आले. त्याची मॅगझीन काढून पाहिली असता त्यामध्ये एक जिवंत काडतुस मिळून आले. त्याबाबत त्याच्याकडे विचारणा केली असता त्याच्याकडे या शस्त्राचा कोणत्याही प्रकारे परवाना नसल्याचे त्याने सांगितले. यामुळे या तिघांना ताब्यात घेवून त्यांच्याकडील पिस्टल, मोटार सायकल व तीन मोबाईल तपास कामी जप्त करण्यात आलेले आहेत.
याबाबत फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून या गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक एन. आर. गायकवाड हे करीत आहेत. आरोपी यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने या तिघांना दि.२४ पर्यंत म्हणजेच ५ दिवसांची पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केलेली आहे.
ही कारवाई पोलीस अधिक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधिक्षक धिरज पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांच्या मार्गदर्शनाखाली फलटण शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भारत किंद्रे, सहायक पोलीस निरीक्षक एस.के.राऊळ, पोलीस उपनिरीक्षक अमोल कदम, सहायक फौजदार एस. एन. भोईटे, पोलीस हेड कॉन्स्टेबल व्ही. पी. ठाकूर, पोलीस नाईक एस.डी.सुळ, पोलीस नाईक एस. ए. तांबे, पोलीस नाईक एन. डी. चतुरे, पोलीस नाईक व्ही. एच. लावंड, पोलीस शिपाई ए. एस. जगताप, पोलीस कॉन्स्टेबल डि. पी. सांडगे यांनी केली आहे.

*AJ 24 Taas News Maharashtra साठी शरीफ काझी फलटण प्रतिनिधी*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा