Breaking

सोमवार, १७ मे, २०२१

AJ 24 Taas News Maharashtra चा आठवा भागकुर्डुवाडी नगरपालिका प्रशासनाची खाजगी लॅबवाल्यांविरुध्द दुटप्पी भूमिका...* *ग्रामीण रुग्णालयाने आठ दिवसांपूर्वी दिलेला आदेश ठेवला बासनात गुंडाळून...* *अनधिकृत लॅबवाल्यांना पाठीशी घालणारे पडलें उघडे...* *राज्यभर कारवाई सुरू कुर्डुवाडी व सोलापूर जिल्ह्यात कां नाही?...* *कसा होणार कोरोनो कमी?**


*AJ 24 Taas News Maharashtra चा आठवा भाग


कुर्डुवाडी नगरपालिका प्रशासनाची खाजगी लॅबवाल्यांविरुध्द दुटप्पी भूमिका...*
    *ग्रामीण रुग्णालयाने आठ दिवसांपूर्वी दिलेला आदेश ठेवला बासनात गुंडाळून...*
    *अनधिकृत लॅबवाल्यांना पाठीशी घालणारे पडलें उघडे...*
   *राज्यभर कारवाई सुरू कुर्डुवाडी व सोलापूर जिल्ह्यात कां नाही?...*
   *कसा होणार कोरोनो कमी?*
AJ 24 Taas News Maharashtra
*✒️कुर्डुवाडी विशेष बुलेटिन✒️*
*अरुण कोरे पत्रकार यांजकडून...*

       *कुर्डुवाडी शहरांत मोकाट फिरणाऱ्या कोरोनो पाॅझीटीव्ह रुग्णांवर योग्य ती कारवाई करुन होम काॅरंटाईन रुग्णांबाबत अधिक दक्षता घेण्याचे नगरपालीकेच्या कार्यालयास कळवूनही त्यांची योग्य ती कार्यवाही झालेली दिसून येत नाही.*
     *यापूर्वी विशेष बुलेटिन मधून खाजगी लॅबवाल्याविरुध्द महिन्यांपूर्वी आवाज उठविल्यानंतर ७२ तासाच्या आत पोलिसी धाडसत्राने सर्वं प्रशासकीय यंत्रणा चक्रावल्या होत्या व उघड्यावर पडल्या होत्या.*
      *धाडसत्रानंतर लॅबवाल्यांना आर.टी.पी.सी.आर.करण्यास प्रतिबंध करण्यात आला होता.व त्यावेळी लॅबवाले रुग्णांना काॅरंटाईन करीत नसल्याने शहरांत कोरोनो पाॅझीटीव्ह रुग्णांचे प्रमाण वाढल्याचा ठपका ठेवून त्यांना तपासणीस मज्जाव करण्यात आला होता.व त्यास ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने दुजोराही दिला होता.*
      *त्यानंतर आठ दिवस अनधिकृत लॅबवाल्यांच्या कडून होणा-या तपासण्यां थांबविण्यात आल्या होत्या.विशेष म्हणजे याच काळात कोरोनोचा स्प्रेड दणक्यात निम्म्याहून कमी आला होता.*
     *पण पुन्हा अचानकपणे स्थानिक प्रशासनाच्या प्रोत्साहनाने व वैद्यकीय क्षेत्रातील रॅकेटच्या आशिर्वादाने अर्थपूर्ण व्यवहारातून अनधिकृत लॅबवाल्यांच्या तपासण्या सुरू झाल्यानें शासकीय पातळीवर आश्चर्य व्यक्त करण्यात येत होते.*
      *नगरपालिका प्रशासनाने दुटप्पी भूमिका घेतल्याने ही बाब ग्रामीण रुग्णालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आली होती.*
    *त्यानंतर ग्रामीण रुग्णालयाच्या खंबीर रणरागिणी अधिक्षिका सुनंदा रणदिवे यांनी १० मे २०२१ रोजी पत्र क्र.४९४/९५ अन्वये मोकाट हिंडणा-या रुग्णांवर अधिक जागरूक राहून कारवाई करण्याचें सांगण्यात आले.तसेच अधिकृत तपासण्या करणणा-या लॅबव्यतिरिक्त अनधिकृत आर.टी.पी.सी.आर.करणा-या लॅबवाल्याविरुध्द कारवाई करण्याचेही कळविण्यात आले होते.*
       *याच पत्रात अधिकृतपणे शाळा नं.३,श्री क्लिनिकल लॅबोरेटरी संतोष हाॅस्पीटल टेंभुर्णी रोड कुर्डुवाडी व समर्थ लॅब साखरे हाॅस्पिटल माढा रोड कुर्डुवाडी यांनाच आर.टी.पी.सी.आर. कोव्हीड तपासणी करण्यासाठी अधिकृतपणे परवानगी असल्याचेही लेखी १० मे रोजीच कळविण्यात आले होते.याव्यतीरिक्त असल्यास कारवाई करण्यात यावी असेही कळविण्यात आले होते.याबाबत सोलापूर येथील वरिष्ठांनाही त्याची प्रत पाठविण्यात आली होती.*
      *यानंतरही आठ दिवस उलटले तरी वैद्यकीय क्षेत्रातील रॅकेट व लॅबवालेविरुध्द कोणतीही कारवाई केली गेलेली नाही.*
      *उलट रुग्णांना काॅरंटाईन न करणे,रुग्णांचे रिपोर्ट आठ आठ दिवस दडवून ठेवणे, वैद्यकीय क्षेत्राला माहिती असूनही जाणीव पूर्वक अनधिकृत लॅबवाल्यांकडून तपासण्या करणे असे प्रकार सर्रास सुरूच आहेत.*
       *याबाबत मुख्याधिकारी यांना संपर्क साधला असता ते फोनही उचलत नाहीत.व गंभीर बाबींकडे जाणीव पूर्वक दुर्लक्ष करित असल्याचे समोर आले आहे.*
    *आळंदीच्या ज्ञानोबा आता पावरे...कोरोनो घालवून घररुपी मंदीरी बस रे...असे म्हणण्याची कुर्डुवाडीकरावर वेळ आली आहे.*
    *प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे लाखोंची बिले भरुनही रुग्णांच्या जिवाशी खेळ मांडला जात आहे... मग सांगा कसा होणार कोरोनो कमी?*
      *याबाबत अधिक चौकशी करता असे स्पष्टपणे आढळून आले आहे की कुर्डुवाडी शहरांतील ९० टक्के लॅबवाल्यांना रक्त/लघवी पासून कोणत्याच तपासण्या करण्याच्या शासनमान्य कोणत्याच परवानग्या नाहीत.*
     *लॅबवालेच बोगस आहेत.वैद्यकीय क्षेत्रातील रॅकेटच्या प्रभावाखाली विषारी हातभट्टी पेक्षाही भयाण धंदा सुरू असल्याने नागरिकांनी अधिक सतर्क व जागरूक राहूनच तपासण्या करणे गरजेचे आहे.*
    *यांच्या गैरप्रकारांमुळे किती जणांचे जीव गेले अन् आणखी किती जणांचे घेणार?त्यांनाच ठाऊक.*
     *तातडीने कारवाई करा शहरवासीयांचा रास्त आक्रोश.*




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा